घरठाणेपरमबीर सिंह यांच्याविरोधात ठाणे पोलिसांची लूकआऊट नोटीस

परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाणे पोलिसांची लूकआऊट नोटीस

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. ईडी आणि सीआयडीकडून वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. त्याला खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दुजोरा दिला आहे. परमबीर सिंह आपल्या घरी नाहीत. तसेच केंद्र आणि राज्यांच्या तपास यंत्रणांकडून अनेक समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात एनआयएकडून परमबीर सिंह यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले आहे. पण आतापर्यंत एकही समन्स परमबीर सिंग यांना पोहोचले नाही. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर सिंह परदेशात गेल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह हे देशातील असल्याची शक्यता गृहविभागातील सूत्रांकडून मिळतेय.

- Advertisement -

आता ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे परमबीर हे आता विमानतळावरून देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे सिंह यांचा रजेचा कालावधीही संपला आहे; पण रजेचा कालावधी वाढवण्यासाठीही त्यांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे परमबीर सिंह हे कुठे आहेत? असा सवाल आता विचारला जात आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, परमबीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत, अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमबीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -