घरठाणेएक कोटी २८ लाखांचे ७११ मोबाईल केले ठाणे पोलिसांनी परत

एक कोटी २८ लाखांचे ७११ मोबाईल केले ठाणे पोलिसांनी परत

Subscribe

टार्गेट मोबाईल हॅण्डसेट्स या विशेष पथकाला यश

ठाणे: ठाणे शहर परिमंडळ १ अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन हरवलेले आणि चोरी गेलेले तब्बल ७११ मोबाईल फोन ठाणे शहर पोलिसांना परत करण्यात यश आले. या मोबाईलची किंमत १ कोटी २८ लाख असून या मोबाईलच्या सगोध घेण्यासाठी टार्गेट मोबाईल हॅण्डसेट्स या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्या पथकाने शासनाने तयार केलेले Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलना वापर करून https://cer.gov.in या संकेतस्थळावर हरविलेले / चोरीस गेलेल्या मोबाईल धारकाची वैयक्तिक माहिती भरुन तसेच IMEI CDR मागवून ते मोबाईल निगराणीखाली ठेवून शोध घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो मुद्देमाल फिर्यादी / मूळ मालकांस गुरुवारी अप्पर पोलीस आयुक्त डॉ महेश पाटील हस्ते तर उपायुक्त गणेश गावडे यांच्या उपस्थितीत अभिहस्तांतरण करण्यात आलेले आहेत. परत मोबाईल मिळाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -