घरठाणेठाण्यात सरकारच्या निषेधाची हंडी मनसेनं फोडली, अविनाश जाधव ताब्यात

ठाण्यात सरकारच्या निषेधाची हंडी मनसेनं फोडली, अविनाश जाधव ताब्यात

Subscribe

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप पुर्णतः संपलेला नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. असे असताना देखील कृष्ण जन्माष्टमीच्या मुर्हतावर ठाण्यात मनसेने दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सवाचे स्वागत केल्याचे समोर आले आहे. आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी होती, यासाठी सोमवारी सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली होती. ठाणे पोलिसांच्या समोरच मनसेने दोन थर लावून हंडी फोडली. मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडल्याने मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांसह मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. इतकेच नव्हे तर हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्याची भूमिका असलेले आणि सरकारने निर्बंध घातले असले तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार या मतावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ठाम आहेत. मात्र आज मनसे कशाप्रकारे दहीहंडी साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह घाटकोपर भटवाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सरकारच्या निषेधाची हंडी मनसेनं फोडली. यावेळी मनसेने पाच थराची हंडी फोडून सरकारचा निषेध केला. सर्व गोविंदानी मास्क लावत थर लावले होते. तर सरकारची दडपशाही चालणार नाही असे म्हणत, मनसेच्या गोविंदा पथकाने वरळी नाका इथेही दहीहंडी फोडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहीहंडीबाबत नियमावली जारी केली आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्या तरी चालेल दहीहंडी उत्सव साजरा करणार असा इशारा मनसे आधीच दिला होता. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी हा दहीहंडी उत्सव साजरा केला.

- Advertisement -

यंदा देखील राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्याबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गोकूळ जन्माष्टमी गोपाळकाला साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. मात्र कोरोना अजून संपला नसल्यामुळे सणासुदीच्या काळात गर्दी करुन चालणार नाही. गर्दी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळेच राज्य सरकारडून सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने निर्बंध लादले असले तरीही दहीहंडी उत्सव करणार अशी आक्रमक भूमिका भाजप आणि मनसेने घेतली आहे. यासह साकीनाका तसेच दादर येथील खांडके बिल्डिंग येथे देखील मनसे तर्फे महाविकास आघाडी ए तालिबानी सरकारच्या निषेधार्थ हंडी फोडण्यात आली. यावेळी पोलिस आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -