ठाण्याच्या घोडबंदर रोडवर खड्ड्याचा पहिला बळी; बसखाली चिरडून बाईकस्वाराचा मृत्यू

एकाच दिवशी दोन घटना, दुसऱ्या घटनेतील चालक बचावला

thane rain update first death due to pothole on thane Ghodbunder Road

दुचाकीवरून ठाण्याकडून मुंबईकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन सूफियान शेख हा दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवरती पडला. याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा जागी मृत्यू झाला. ही घटना घोडबंदर रोडवरील काजूपाडा येथील रस्त्यावर मंगळवारी सकाळ घडली. ही घटना ताजी असताना, त्याच ठिकाणी मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वाराचा खड्ड्यामुळे तोल जाऊन अपघातात झाला. मात्र तो दुचाकीस्वार बचावला आहे. अशी माहिती कासारवडवली पोलिसांनी दिल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

घोडबंदर रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्यामुळे मंगळवारी सकाळी याच वाहिनीवरून दुचाकी घेऊन सूफियान शेख हा ठाण्याकडून मुंबईकडे जात होता. खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन तो दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवरती पडला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

या घटनेतील एसटी बस चालकाचे नाव अद्यापही समजू शकले नसून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपघाती नोंद करण्यात आली आहे. तर या घटनेनंतर काही तासांच्या अंतराने त्या खड्ड्यात दुचाकीवरून जाणारा दुसरा दुचाकीस्वार तोल जाऊन दुपारच्या सुमारास रस्त्यावरती पडला. मात्र त्यावेळी पाठीमागून कोणतेही वाहन येत नसल्याने तो दुचाकीस्वार बचावला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. अशी माहिती कासारवडवली पोलिसांनी दिल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी सांगितले.

तसेच त्या ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाला याबाबत भेट देत कारवाई करावी, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची हत्या; सीसीटीव्ही फुटेजमधून घटना उघडकीस