राष्ट्रवादीची ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ठाणे । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या यादीला नुकतीच मान्यता देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी याविषयी माहिती दिली आहे. अविनाश देशमुख यांची उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे. तसेच जयराम चव्हाण यांचीही निवड झाली आहे. या शिवाय 14 जणांची ठाणे ग्रामीणच्या विविध भागात उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच खजिनदारपदी प्रशांत एंगडे, तर सरचिटणीसपदी 17 जणांना संधी मिळाली आहे. तर कृष्णा हेगडे यांना सह चिटणीस म्हणून मान्यता मिळाली आहे. सेवक महादेव देशमुख, लक्ष्मण फुलवारे, सुरेश सिंह यांच्यासह इतर सात जणांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.