घरठाणेवर्षोनुवर्षे दंड न भरणाऱ्यांनो लोकअदालतमध्ये हजर व्हा, वाहतूक पोलिसांचे आवाहन

वर्षोनुवर्षे दंड न भरणाऱ्यांनो लोकअदालतमध्ये हजर व्हा, वाहतूक पोलिसांचे आवाहन

Subscribe

नेहमीची घाई आणि गडबड असल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातात. मात्र वारंवार नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर वचक किंवा त्यांच्याकडून वाहतुकीचे नियमांचे पालन व्हावे यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून जनजागृती तसेच कारवाई करताना दंड आकाराला जातो. मात्र आकारलेल्या दंडाची रक्कम मान्य नसल्याने बहुतांश जण वर्षोनुवर्षे दंड भरणे टाळतात.अशा एक लाख १६ हजार जणांना नुकत्याच ठाणे शहर वाहतूक शाखेकडून नोटिसा बजावून त्यामध्ये तडजोड शुल्क येत्या २३ सप्टेंबरपर्यंत भरा अन्यथा शनिवारी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत हजर राहावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

याचदरम्यान तरीसुद्धा या नोटिसाकडे कानाडोळा करू पाहणारे पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत आढळून आल्यास त्यांचे थेट वाहन जप्त करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल. तसेच यावेळी दंडाबरोबर पुढील होणाऱ्या कायदेशीर कारवाईला सामोरेही जावे लागेल असे संकेत वाहतुक शाखेमार्फत देण्यात आले आहे.

- Advertisement -

नवी दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणे जिल्हातील सर्व न्यायालयात येत्या शनिवारी २५ सप्टेंबर २०२१ रोजी “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा व तालुका न्यायालयीन क्षेत्रातील न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाहतुक नियमांचे उल्लंघन करून कारवाई केलेल्या नागरिकांकडून वर्षोनुवर्षे दंड भरलेला नाही अशा वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत त्यांच्या जवळच्या वाहतुक उपविभागात तडजोड रकमेचा भरण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या नागरिकांना तडजोड शुल्क मान्य नसेल,त्यांनी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत ठाणे न्यायालयात हजर रहावे. असे ठाणे शहर वाहतुक विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड न भरणाऱ्या १ लाख १६ हजार जणांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच त्यांना दंड भरण्याबाबत सूचित केले. अन्यथा त्यांना राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हजर राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. जे दंड भरण्यास टाळला टाळ करतील आणि पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान आढळून येतील, अशांवर दंडात्मक करवाईसह कायदेशीर कारवाई होईल.

– ठाणे शहर वाहतूक शाखा उपायुक्त प्रभारी श्रीकृष्ण कोकाटे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -