ठाण्यात संरक्षण भिंत पडून दोन महिला जखमी; जखमींमध्ये ६५ वर्षीय आजीबाईंचा समावेश

Thane two injured when wall collapses

मुलुंड टोलनाकाच्या अगोदर असलेल्या मॉडेला कंपनीची अंदाजे ५०-फूट लांबीची संरक्षक भिंत पडल्याची घटना मंगळवारी १२ वाजून ४१ मिनिटांच्या सुमारास समोर आली. या घटनेत मॉडेला वसाहततील सुनीता गुप्ता (३४) आणि सरस्वती आचार्य (६५) दोघी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना मुलुंड येथील टी-वॉर्ड रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

मंगळवारी १२:४१ वाजताच्या सुमारास मॉडेला कंपनीची अंदाजे ५०-फूट लांबीची संरक्षक भिंत पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता यांनी धाव घेतली.

या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून मॉडेला वसाहतमधील खोली क्रमांक-१२ आणि खोली क्रमांक-०३ मधील २-महिला किरकोळ जखमी झाल्याचे समोर आले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.


दुहेरी हत्याकांडाने निफाड तालुका हादरला !