घरठाणेमहाविकास आघाडीला झुकते माप तर भाजपसमोर अडचणीचे डोंगर

महाविकास आघाडीला झुकते माप तर भाजपसमोर अडचणीचे डोंगर

Subscribe

ठाणे महापालिकेसाठी प्रारूप प्रभाग रचना सादर

कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या राजकीय नेत्यांबरोबर इच्छुक उमेदवारांचे प्रतीक्षा अखेर संपली. मंगळवारी ठाणे महानगरपालिकेने ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना सादर केली आहे.  तर येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत सूचना, हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या मार्च महिन्यात प्रारूप प्रभाग रचना निश्चित होईल. ठाणे महापालिका हद्दीत वाढलेल्या  प्रभागांसह एकूण 47  प्रभागांच्या प्रारूप रचनेनुसार 142 सदस्य निवडून जाणार आहेत.

आगामी निवडणुकीत महाविकास विरुद्ध भाजप किंवा सेना,भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे पक्ष विभक्तपणे आपले डाव मांडणार हे लवकरच निश्चित होईल.  याचदरम्यान महाविकास आघाडीच्या दृष्टीनेच ही प्रभाग रचना तयार केल्याचे दिसत आहे. सत्ताधारी शिवसेनेचा वरचष्मा या प्रभाग रचनेत प्रामुख्याने दिसून येत आहे. तसेच या प्रभाग रचनेकडे पाहिल्यास भाजपच्या बालेकिल्यात कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने तयार केल्याने त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे अनेक प्रभागांचे सीमा रेषा या रस्त्यानुसार नसून त्या सोसायटीच्या भिंतीनुसार धरल्या गेल्याने सर्वांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

- Advertisement -

ठामपाच्या २०१९ च्या सर्वाधिक निवडणुकीत चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होता. तर यावेळी तीन नगरसेवकांचा एक वॉर्ड तयार केला गेला असून मात्र लोकसंख्ये मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन नगरसेवकांचा वॉर्ड तयार केल्याने विद्यमान एक नगरसेवकाला पर्यायी निवडण्याशिवाय पर्याय नाही. याचा शिवसेनेच्या नगरसेवकांनाच जास्त फायदा आहे. तसेच भाजपच्या विद्यमान चार पैकी एकाला पर्याय निवडणे खूपच अवघड होण्याची शक्यता आहे.

येथे वाढणार नगरसेवक
२०१९ मध्ये झालेल्या ज्या विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी शिवसेनेला अधिकची मते मिळाली होती. नेमके त्याच मतदार संघात नवीन नगरसेवकांची संख्या देखील वाढणार असल्याचे बोलले जात आहे.  त्यातच ठाणे, कोपरी – पाचपाखाडी आणि अर्धा ओवळा माजिवडा या अडीच विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी पालिकेवर ८४ नगरसेवक निवडून जात होते. त्यात आता ६ नगरसेवकांची वाढीव होऊन ९० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. तर कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघासह दिवा येथे ४७ नगरसेवकाचे थेट ५२ नगरसेवक होणार आहेत.एकीकडे शिवसेनेला आणि दुसरीकडे राष्ट्रवादीला याचा फायदा होईल असेच दिसत आहे.

- Advertisement -

या ठिकाणी झाली लोकसंख्या कमी
ओवळा माजीवडा या विधानसभा मतदारसंघातील वर्तकनगर भागात एक वॉर्ड यापूर्वी ३९ हजार लोकसंख्येचा होता, तो आता २४ हजार लोकसंख्येवर आला आहे. त्यातही अनेक ठिकाणी रस्त्यांची सीमा न धरता सोसायटींच्या इमारतींची सीमा या धरण्यात आल्याचेही दिसत आहे.

भाजपसाठी काटे की टक्कर
प्रभाग रचना तयार करताना,भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नौपाडा आणि कोपरीतील अनेक वॉर्ड हे थेट मोडतोड करुन वागळे इस्टेटपर्यंत नेण्यात आला आहेत. त्याचप्रमाणे घोडबंदर भागातही अशाच प्रकारे वॉर्डची रचना केल्याने भाजपसमोर आता काटे की टक्कर करावी लागणार आहे.

१४ फेब्रुवारी पर्यंत हरकती आणि सूचना
प्रारूप प्रभाग रचना व निवडणूक प्रभागांच्या सीमाबाबत हरकती व सूचना सोमवार १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत दिली आहे. या हरकती महानगरपालिका आयुक्त, निवडणूक कार्यालय अथवा माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती, लोकमान्यनगर- सावरकरनगर प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, नौपाड़ा – कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती व दिवा प्रभाग समिती या प्रभाग कार्यालयांमध्ये सादर कराव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरीकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -