घरठाणेशुक्रवारी ठाण्यात पाणीबाणी, पुरवठा बंद राहाणार असल्याने पाणी जपून वापरण्याचा मनपा सल्ला

शुक्रवारी ठाण्यात पाणीबाणी, पुरवठा बंद राहाणार असल्याने पाणी जपून वापरण्याचा मनपा सल्ला

Subscribe

 

ठाणे: स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे येत्या शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंत कोपरी परिसरात ही पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी पाणी जरा जपून वापरावे. या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

- Advertisement -

स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा २४ तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे.

या भागात बंद राहणार पाणी पुरवठा
या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९.०० ते शनिवार २७ मे रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

- Advertisement -

गुरूवारी कोपरीत पाणी नाही
कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची ५०० मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार, २५ मे सकाळी ९.०० पासून ते शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ९.०० पर्यंत २४ तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -