Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यातील २८ हॉस्पीटल्स बंद

ठाण्यातील २८ हॉस्पीटल्स बंद

३४७ रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी

Related Story

- Advertisement -

ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या अग्नीशमन दलाने शहरातील ३४७ खाजगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी केली. या तपासणीअंती जवळपास २८ रूग्णालये बंद असल्याचे आढळून आले तर जवळपास १११ रुग्णालयांनी आपल्या अग्निसुरक्षा परीक्षणाचा अहवाल सादर केला आहे.

ठाणे शहरात रुग्णालयांतील अग्निसुरक्षेत दृष्टीने सर्व खाजगी रुग्णालयाच्या इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (फायर ऑडिट) करण्याची सक्ती ठाणे महापालिकेने केली असून परीक्षणाचा अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. खाजगी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा परीक्षण अहवाल सादर न केल्यास व्यावसायिक आस्थापना चालविण्यासाठी आवश्यक असलेले अन्य परवाने दिले जाणार नसल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून एकून ३४७ रूग्णालयांची यादी अग्नीशामन विभागास प्राप्त झाली होती. या रूग्णालयांच्या अग्नीसुरक्षेची पाहणी करण्यासाठी पथके तयार करून त्यानुसार सर्व रूग्णालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंब्रा व शीळ अग्निशमन केंद्र अंतर्गत ४३ रुग्णालये, जवाहरबाग अग्निशमन केंद्र १२० रुग्णालये , वागळे अग्निशमन केंद्र ५९ रुग्णालये, कोपरी अग्निशमन केंद्र ६ रुग्णालये, पाचपाखाडी अग्निशमन केंद्र ५५ रुग्णालये आणि बाळकूम अग्निशमन केंद्र ६४ रुग्णालये अशी एकूण ३४७ खाजगी रुग्णालयांची नोंद झाली आहे. यामधील २८ हॉस्पिटलबंद असून ३१८ रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. दरम्यान ३१८ पैकी एकूण १११ रुग्णालयांनी आपला अहवाल सादर केला आहे. उर्वरीत रुग्णालयांना २२ फेब्रुवारी, २०२० पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -