घरठाणेठाणे यंदा परिवहनची 'नो' भाडे वाढीचा संकल्प, कमी पैशात गारेगार प्रवासाचा देणारे...

ठाणे यंदा परिवहनची ‘नो’ भाडे वाढीचा संकल्प, कमी पैशात गारेगार प्रवासाचा देणारे ‘आनंद’

Subscribe

 २०२३ -२४ चे ४८७.६९ कोटींचा मुळ अर्थसंकल्प सादर

ठाणे परिवहनचा २०२३ – २४ चा ४८७.६९ कोटींचा मुळ अर्थसंकल्प परिवहनला समितीला सादर केला. यामध्ये २०१५ नंतर एकदाही भाडेवाढ केली नव्हती तीच परंपरा यंदाही राखत नो भाडे वाढ करण्यावर अर्थसंकल्पात भर देताना, प्रवासी वाढीवर विशेष देण्यात येणार आहे. तर नव्या दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसद्वारे गारेगार सेवा देताना तिकीट दर ही कमी राखण्याचा संकल्प केला आहे. त्या शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत बसेस संख्या कमी असल्याचे म्हटले आहे. तसेच यंदा अनुदानापोटी महापालिका प्रशासनाकडे गेल्या वर्षीपेक्षा यंदा १४० कोटींनी कमी करून म्हणजे ३२० कोटी ६ लाखांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान वाहतुक कोंडी सोडविण्याबाबत उपाय योजना करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्याने दाखल होणाऱ्या बसेस नवीन मार्गे शोधून तेथे सुरू करण्याचा मानस व्यक्त गेला आहे.

ठाणे परिहवनचे व्यवस्थापक बी एस बेहेरे यांनी शुक्रवारी वागळे इस्टेट येथील मीनाताई ठाकरे सभागृहात ठाणे परिवहन समितीकडे यंदाचा मूळ अर्थसंकल्प सादर केला. पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून शुन्य उत्सर्जन – प्रदुषण असलेल्या १२३ इलेक्ट्रीक बस व २० सीएनजी मिडी बस नव्याने परिवहनच्या उपक्रमात दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ३२९ बस सून आगामी काळात १२३ बसपैकी परिवहनच्या ताफ्यात सध्या ११ बस दाखल झाल्या आहेत. जुलै पर्यंत सर्व १२३ इलेक्ट्रीक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून ठाणेकरांना ४७२ बस उपलब्ध होणार आहेत. दरम्यान कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता तिकीट दर कमी करण्यावर भर दिला आहे. तसेच प्रवासी भाडे – प्रवासी भाड्यापोटी सध्या अस्तित्वात असलेल्या बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या बस असे मिळून १३० कोटी ५८ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहेत. तर, जाहीरात, पोलीस ग्रॅन्ट व महापालिकेकडून दिलेल्या सवलती पोटी दिलेले अनुदान हे अपेक्षित उत्पन्नात धरण्यात आले आहे. तसेच जेष्ठ नागरीक ५० टक्के, दिव्यांग १०० टक्के, विद्यार्थी ५० टक्के, ७५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, स्वांतत्र्य सैनिकांची विधवा पत्नी व सोबत सह प्रवासी, तसेच इतरांना देण्यात येणाऱ्या सवलतीमुळे परिवहन सेवेवर येत असल्याने त्याची भरपाई म्हणून अनुदानातून मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. याशिवाय ठाणे परिवहन सेवेने मागील वर्षी ४६० कोटी ५४ लाखांचे अनुदान मागितले होते.

- Advertisement -

यंदा अनुदानापोटी ३२० कोटी ६ लाखांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेतन खर्च, पेन्शन,वैद्यकीय भत्ता, रजा प्रवास भत्ता, सेवानिवृत्ती कर्मचारी थकबाकी, पुरवठा दारकांची देयके, बसमधून प्राप्त होणाऱ्या उत्पन्न व अदायगी मधील तूट, तिकीट मशीन आदींच्या खर्चाचा त्यात समावेश आहे. तसेच वेतन व भत्ते खर्च परिवहन सेवेतील अधिकारी, कर्मचारी वेतन व निवृत्तीधारकांचे पेन्शन, थकबाकी व इतर देणीपोटी २७७ कोटी १६ लाख व इतर प्रशासकीय खर्चासाठी १ कोटी ४५ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे. सेवा निवृत्ती निधी – जानेवारी २०२३ अखेर ९०१ कर्मचारी व २०२३-२४ या आर्थिक वर्षात १२३ कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून १०२४ कर्मचाऱ्यांना उपदान, रजावेतन, व मासिक निवृत्तीवेतन असे सरासरी ३९ कोटी १३ लाख वार्षिक खर्च होणार आहे. असेही नमूद केले आहे. याचबरोबर परिवहन सेवेकडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून त्यापोटी व इतर थकीत द्यावी लागणारी फरकाच्या रकमेसह एकूण थकीत देणी ६८ कोटी ६६ लाख एवढी प्रलंबित आहे. वाहन दुरुस्ती व निगा देखभालीसाठी ६ कोटी ४५ लाख तरतूद, डिझेल सीएनजी पोटी ८ कोटी १४ लाख, सरकारी कर ७ कोटी १९ लाख, पुढील वर्ष भराव्या लागणाऱ्या प्रवासी कर ३ कोटी २४ लाख,बालपोषण अधिकारी १ कोटी ८ लाख, वाहनांचा विमा २ कोटी १७ लाख आदी तरतूद केलेली आहे.

प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना
ठाणे शहरामध्ये येणारा प्रवासी हा मुख्यत्वे मध्य रेल्वेने ठाणे स्टेशन येथे घेऊन इच्छीत स्थळी प्रवास करीत असतो. ठाणे सॅटीस येथून १०४ मार्गावर प्रवासी सेवा पुरविली जाते. सॅटीस येथे आलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता ‘मेगाफोनव्दारे’ सोडण्यांत येणा-या बसेसबाबतची माहिती देण्यांत येणार आहे. सॅटीस येथे प्रवाशांचा ओघ मोठ्या प्रमाणांत असून, प्रवाशाना मार्गदर्शन करणेसाठी प्रवासी गर्दीच्या वेळेत पर्यवेक्षकीय कर्मचा-यांची नियुक्ती करण्यांत येणार आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून हवयं ३२० कोटींचे अनुदान
ठाणे परिवहनने महापालिकेकडून  २०२३ – २४ साठी परिवहनने पालिकेकडून ३२० कोटींच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापैकी महसुली व भांडवलीसह २३७ कोटी ५३ लाख व संचलन तुट अनुदानापोटी ८२ कोटी ५४ लाख इतक्या अनुदानाची ठामपाकडे मागणी करण्यात आली आहे.

वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न
ठाणे परिवहन सेवेतील ६५ बसेसच्या माध्यामतून २१ कोटी ४१ लाख, जेएनयुआरएमअंतर्गत १७१ बसेसच्या माध्यामतून ५५ कोटी २१ लाख, वातानुकुलीत वोल्वो २४ बसेसमधून १३ कोटी ५३ लाख, महिलांकरिता ४६ तेज्स्वीनिबासेस्मधून १२ कोटी १२ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच नव्याने परिवहन उपक्रमात दाखल होणाऱ्या १२३ इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यामतून २३ कोटी ५६ लाख व नवीन मिडी २० सीएनजी बसेसपासून ४ कोटी ७४ लाख असे १३० कोटी ५८ लाखांचे इतके प्रवासी तिकीट विक्रीतून वर्षिक उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

बसेसची संख्या ४७२ होणार
​सद्य:स्थितीत परिवहन सेवेच्या ताफ्यांत ३२९ बसेस दाखला आहे. या बसेसच्या माध्यामतून ठाणेकरांना सेवा पुरविण्यात येत आहे. असे असले तर, यंदाच्या आर्थिक वर्षात २० सीएनजी मिडी बसेस व १२३ इलेक्ट्रीक बसेस पैकी ११ बसेस सध्या दाखल झाल्या असून १५ जुलै २०२३ पासून सर्व १२३ इलेक्ट्रीक बसेससह ४७२ बसेस ठाणेकर नागरिकांना सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

लोकसंख्येच्या मानाने ७९३ बसची गरज
१ लाख लोकसंख्येमागे ३० बस अपेक्षित आहेत. त्यानुसार ठाणे शहराची सध्याची २३ लाख लोकसंख्या लक्षात घेतल्यास ठाणेकरांना ७९३ बसची आवश्यकता असल्याचे अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.

उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणांत रस्ते व मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत. परिणामी बस फे-या रद्द होण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस वाहतुक नियंत्रण कक्ष यांजकडे समन्वय साधून वाहतूककोंडी सोडविणेबाबत उपाययोजना करण्यांत येत आहे. जेणे करुन यामुळे परिवहन सेवेच्या उत्पन्नात वाढ होईल. नविन २० सीएनजी बसेस व १२३ इलेक्ट्रीक बसेससाठी नविन रुट शोधून सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -