घरठाणेसमृध्दी महामार्गाच्या ब्लास्टिंगमुळे खर्डीतील घरांना तडे

समृध्दी महामार्गाच्या ब्लास्टिंगमुळे खर्डीतील घरांना तडे

Subscribe

स्फोटामुळे घरातील भांडे व इतर साहित्य पडून नुकसान

नाशिक-मुंबई राष्ट्रीय समृध्दी महामार्गाचे काम सुरू असून तेथे ब्लास्टिंग सुरू आहे. दरम्यान या महामार्गाला जोडून असणाऱ्या खर्डीत असणाऱ्या गावातील काही घरांना तडे पडल्याचे समोर आले आहे. खर्डी जवळील दळखण गावातील घरांना समृध्दी महामार्गाच्या ब्लास्टिंग स्फोटामुळे घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. स्फोटामुळे घरातील भांडे व इतर साहित्य पडून नुकसान होत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडेही गावकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

- Advertisement -

या ब्लास्टिंग स्पोटामुळे मोठ्या प्रमाणावर माती आणि धुलीकण परिसरात पसल्याने तेथील गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत असून त्याच्या आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. तसेच, १९८३ आणि १९८४ साली झालेल्या भूकंपाचा केंद्र बिंदू खर्डी आहे. या पार्श्वभूमीवर समृध्दी महामार्गावरील ब्लास्टिंगमुळे पुन्हा नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाले आहे. या महामार्गापासून दळखण गाव जवळच असल्याने या गावातील घरांना ब्लास्टिंगचे हादरे बसतात. या दरम्यान गावातील उपसरपंच भगवान मोकाशी यांनी सरकार दरबारी तक्रार केली आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्ग व मुंबई महामार्ग या दोन्ही महामार्गांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यामुळे नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून या समृद्धी महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिकरांना अवघ्या अडीच तासांतच मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे उद्योग व व्यवसायाला मोठी चालना देखील मिळणार आहे. इगतपुरी बायपासच्या पिंप्री सदो येथे समृद्धी महामार्ग उतरणार आहे. पिंप्री सदो येथून जवळच काही अंतरावर नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन असून या वाढत्या अपघातांना आळा बसावा, नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी व्हावा, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी समृद्धी महामार्ग क्रमांक ३ ला उड्डाणपुलाद्वारे जोडणी व्हावी, यासाठी स्थानिक प्रशासनाला देखील यश मिळाले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -