घरठाणे‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीतील सोनेरे पान-डॉ. अतुल भोसेकर

‘स्थलांतर ते स्थित्यंतर’ हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीतील सोनेरे पान-डॉ. अतुल भोसेकर

Subscribe

जिल्ह्यातील डॉ. आंबेडकर रोड, ठाणे (प) या ठाणे शहरातील सर्वांत जुनी अशा गावठाण वसाहतीला 100 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त येथील रहिवाशी प्रदिप तुळशीदास सावंत आणि सुशांत पांडुरंग गायकवाड या नवोदित लेखकांनी लेखन आणि संकलन केलेल्या ’स्थलांतर ते स्थित्यंतर’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कै. वा. अ. रेगे सभागृहात ठाणे जिल्ह्यातील व शहरातील शेकडो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाला.
या ग्रंथाचे प्रकाशन प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक व लेणी संवर्धन चळवळीचे प्रवर्तक डॉ. अतुल भोसेकर यांचे हस्ते संपन्न झाले. या ग्रंथाची प्रस्तावना आंबेडकरी चळवळीतील लेखक कवी प्रा. दामोदर मोरे (मराठी भाषा विभाग, जोशी बेडेकर कॉलेज ठाणे) यांनी लिहिली आहे. या ग्रंथातील विषयांच्या मांडणी प्रा.डॉ.गिरिश मोरे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी केल्या आहेत. तर या ग्रंथाचे साहित्यिक परिक्षण प्रा. विजय कृ. मोहिते (सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई ) यांनी केले आहे. या ग्रंथाचे मुद्रित शोधन मिलिंद धुमाळे (संपादक-जागल्या भारत, मुंबई ) यांनी केले आहे.

हा ग्रंथात आंबेडकरपूर्व आणि समकालीन चळवळीतील ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वयोवृद्ध सहकारी, महाड क्रांती चवदार तळे संगराचे प्रमुख शिलेदार आणि डॉ.आंबेडकर रोड,ठाणे (प) या गावठाण वसाहतीचे जनक समाजनायक शिवराम गोपाळ जाधवबाबा यांच्या कार्याला समर्पित असे लेखन शब्दबद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे या ग्रंथात समकालीन व आंबेडकरोत्तर काळातील ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते कर्मयोगी तुळशीराम शिवराम धोत्रे गुरुजी आणि त्यांचे समकालीन सहकारी यांच्या सामाजिक जीवनावर आधारित लेखन केलेले आहे. या तीनशे पानांच्या ग्रंथात शिवराम गोपाळ जाधव ते धोत्रे गुरुजी, त्यांचे समकालीन सहकारी आणि त्यांच्या मृत्युपश्चात या वसाहतीतून उदयास आलेली नेतृत्वे आणि क्रांतीकारक महिलांच्या संघर्ष कथा व त्यांच्या ठाणे जिल्ह्याच्या चळवळीतील सामाजिक जीवनपटावर लेखन केले आहे. या ग्रंथात तीन वेगवेगळ्या कालखंडामध्ये या वसाहतीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक चळवळींचे विश्लेषण करण्यात आले आहे.

- Advertisement -

या प्रकाशन सोहळ्यास प्रताप जी. पाटील ( सेवानिवृत्त विक्रीकर सहाय्यक आयुक्त), प्रभाकर एम.थोरात ( माजी डेप्युटी कलेक्टर, ठाणे), प्रकाश रवीराव (सहाय्यक संचालक,नगर रचना, ठाणे), सुभाष तु. धोत्रे ( लेखक, कवि, समिक्षक), डॉ. मिलिंद रा. उबाळे (सूक्ष्मजीवशास्त्र तज्ञ,राजीव गांधी मेडिकल कॉलेज, कळवा), मदन ग. वाघचौडे (कार्यकारी अभियंता न.मुं.म.पा), राजश्री रमेश पंडीत (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या), सुरेन्द्र वि. महाडिक ( वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते), राजय य. गायकवाड, अॅड प्रज्ञेश चै. सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध कायदेतज्ञ) यांची उपस्थिती लाभली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुनिल अ. भालेराव (संघटक – डिव्ही.डायरेक्टर वोल्टास प्रा.लि.) यांनी भूषविले.
या ग्रंथाचे प्रकाशन नशनलिस्ट नेटिव्ह फेडरेशन (रजि) या सामाजिक संस्थेद्वारे करण्यात आले आहे. या सोहळ्याचे सूत्र संचालन प्रदिप तु. सावंत यांनी, तर प्रमोद के. भोजने यांनी सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन सुशांत पां. गायकवाड यांनी केले. या ऐतिहासिक सोहळ्यास ठाण्यातील अपर कामगार आयुक्त, कोकण शिरीन संजू लोखंडे याची उपस्थिती लाभली. प्रस्तुत ग्रंथ हा सवलतीच्या दरात 300 रुपयांत फक्त या रकमेत प्रदिप तु. सावंत यांच्याकडे 91 99678 47523 या मोबाईल क्रमांकावर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -