Maharashtra Assembly Election 2024
घरठाणे२४ डिसेंबरपूर्वी आरक्षण द्या...अन्यथा सरकारचे काही खरे नाही

२४ डिसेंबरपूर्वी आरक्षण द्या…अन्यथा सरकारचे काही खरे नाही

Subscribe

जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ डिसेंबरपूर्वी निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मात्र तसे झाले नाही तर दुसर्‍याच दिवशी आरक्षणाविषयी २५ डिसेंबरला मराठा बांधवांची बैठक घेण्यात येईल आणि पुढील दिशा ठरवण्यात येईल, त्यानंतर सरकारचे काही खरे नाही, होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने दिलेला अल्टीमेटम पाळावा, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावर २१ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी हा इशारा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच जरांगे पाटील यांनी असा इशारा दिल्याने ठाण्यातील राजकीय चर्चांना उधाण आले होते. लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होईल, त्यात निर्णय घ्यावा, २४ डिसेंबपरर्यंत मी काहीही अडथळा आणणार नाही. मात्र दिलेल्या वेळेत निर्णय झाला नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल,असे जरांगे पाटील म्हणाले. मराठे एकत्र आल्यामुळे लढा ८० टक्के यशस्वी झाला असून केवळ कायद्याची अंमलबजावणी उरलेली असल्याचे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांसाठी कसोटीचा काळ असल्याचे ते म्हणाले. आरक्षणाच्या लढाईल ताळमेळ राखण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले जावेत, त्यांचा ओबीसीत समावेश केला जावा, तसेच मी गावी जाण्याआधी टाईमबॉन्ड करावा, अशा मागण्याची त्यांनी केल्या. असा टाईमबॉन्ड आम्ही तयार केला आहे, मात्र त्यावर सही करण्याची हिंमत कोणीच दाखवत नसल्याचे जरांगे- पाटील म्हणाले. आम्ही आमचे आंदोलन शांततेत सुरूच ठेवणार असून मराठ्यांचा संयम पाहू नये, याआधी महाविकास आघाडीच्या सरकारकडेही आम्ही मागणी केलीच होती, मी मराठ्यांशी गद्दारी करू शकत नाही, आमचे आंदोलन सरकारशी जुळवून घेण्यासाठी नसून आरक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

‘त्या एका’ माणसासाठी ६ कोटी जणांना वेठीस धरू नका
सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलनातील आमच्यावरील गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत, एका माणसाच्या विरोधासाठी  तुम्ही ६ कोटी लोकांना वेठीस धरू शकत नाही, असे बोलून जरांगे-पाटील यांनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ यांच्यावर टिका केली. ‘त्यांनी’ कायदा पायदळी तुडवला, दंगली घडवण्याचा प्रयत्न केला म्हणून माझा त्यांंना विरोध असल्याची टिका जरांगे-पाटील यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांच्यावर केली. सर्व मराठ्यांना ५० टक्क्यांपेक्षा कमी ओबीसी सवलतीचे प्रमाणपत्र २४ डिसेंबरपूर्वी द्यावे, ओबीसी आणि मराठे हे लहान मोठ्या भावासारखे आहेत. मराठ्यांवर ७० वर्षे अन्याय झाला असून आरक्षण जवळ आल्याने मी शांत आहे, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

राज्यात दंगली भडकावण्याचे प्रयत्न
राज्यात काही लोक जातीय दंगली भडकावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र आम्ही त्याविरोधात जनजागृती करत आहोत, त्यामुळे मराठे शांत आहेत, असे जरांगे-पाटील म्हणाले. सरकारने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस पुढे केले असल्याची टिका त्यांनी या सभेत केली. आता कितीही गुन्हे दाखल होवोत, मराठा मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. सरकारने सरकारचे काम केले नाहीतर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री यांना सगळ्या मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. सरकारला मराठा आरक्षण द्यायचे की नाही? हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -