घरठाणेपाच-सहा फुटांवर मुख्यमंत्री होते, विनयभंगासंदर्भात खुलासा करावा; अजित पवारांचा शिंदेंवर पलटवार

पाच-सहा फुटांवर मुख्यमंत्री होते, विनयभंगासंदर्भात खुलासा करावा; अजित पवारांचा शिंदेंवर पलटवार

Subscribe

कारण नसताना नवीन कायदे केले. त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचं काम सुरू असेल तर यासंदर्भात जनतेने जागृकतेने पाहिल्या पाहिजेत. सरकारनेही हे चुकलंय हे सांगण्याचं धाडस केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी आग्रही विनंती मी करतोय, असंही अजित पवार म्हणाले.

पुणे – कळवा आणि ठाणे शहाराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या उद्धाटनप्रसंगी जितेंद्र आव्हाड यांनी वाईट स्पर्श केला, असा आरोप करून भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्रभर आंदोलने सुरू आहेत. विनाकारण जितेंद्र आव्हाडांना यात गोवलं जातंय असा दावा राष्ट्रवादीकडून केला जातोय. त्यामुळे आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या घटनेतील प्रत्यक्षदर्शी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच ते सहा फुटांच्या अंतरावर होते, त्यामुळे त्यांनीच आता खुलासा करावा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात येतात, त्या मतदारसंघातील आमदाराला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जावं लागतं. त्यानुसार जितेंद्र आव्हाड कळवा पुलाच्या उद्घाटनाला गेले होते. जोपर्यंत आपल्यापेक्षा वरिष्ठ नेता गाडीत बसत नाही तोवर आम्ही गाडीत बसत नाही. व्हिडीओतील दृष्यानुसार, त्या गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढेच बसले आहेत. ड्रायव्हर शेजारी आहेत. डावीकडे जितेंद्र आव्हाड सर्वांना बाजूला व्हायला सांगत होते. तिथे असलेल्या भगिनीला बाजूला हो सांगून ते पुढे गेले. असं असतानाही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. मुख्यमंत्र्यांच्या पाच ते दहा फुटांच्या अंतरावर हा प्रकार घडला. त्यामुळे नेमकं काय घडलं हे त्यांनी सांगितलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही कोणत्याही प्रकारे सत्तेवर आला असलात तरी कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाही. वैचारिक मतभेद असतात, मतमतांतरे असतात. पण अशाप्रकारे घटना घडू लागल्या तर महाराष्ट्राला परवडणारं नाही. महागाई, बेरोजगारी, प्रकल्प बाहेर जात आहेत यात जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. चांगलं झालं की आम्ही केलं, चुकीचं घडलं की आम्ही केलं, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

कारण नसताना नवीन कायदे केले. त्याचा आधार घेऊन लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचं काम सुरू असेल तर यासंदर्भात जनतेने जागृकतेने पाहिले पाहिजेत. सरकारनेही हे चुकलंय हे सांगण्याचं धाडस केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी आग्रही विनंती मी करतोय, असंही अजित पवार म्हणाले.

राजीनामा देऊ नका

जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, तसा विचारही मनात आणू नये. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतोय, त्यांनी अनेक चढ उतार, स्थित्यंतरे पाहिली. आपण कधी सरकारमध्ये असतो कधी नसतो. पण सध्या शिंदे फडणवीस सरकार दडपशाही करतंय, असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मविआतील महिला नेत्या एकत्र, राज्यपालांची भेट घेणार

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -