व्हॅलेंटाईन डेला लग्नाच्या बेडीत अडकण्याची क्रेज ओसरतेय

अवघ्या ४० जोडप्यांनी केले लग्न

व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधून बहुतांशी प्रेमीयुगुल या दिवशी आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करतात, गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे प्रेमी युगुलांना हा मुहूर्त साधता आला नव्हता, त्यामुळे यंदा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जास्तीत जास्त प्रेमीयुगुल लग्नाचा बार उडवतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र यावर्षी अवघे ४० प्रेमीयुगुलांनी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधला आहे. हा जरी चार वर्षातील मोठा असा तरी १० फेब्रुवारी २०२२ रोजी ५१ जोडप्यांनी या ‘डे’ला महत्व न देता मुहूर्ताला महत्व दिल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे व्हॅलेंटाईन डे क्रेज ओसरतेय की काय अशी भीती वाटू लागली आहे.
व्हॅलेंटाईन डे मध्ये जागतिक प्रेमदिन याच दिवशी विवाह बंधनात अडकण्याची प्रेमीयुगुलांची नेहमी धडपडत पाहण्यास मिळते. यासाठी विवाह नोंदणी कृत कार्यालय ही तितक्याच सज्जतेने या नव्या जोडप्यांचा उत्साह वाढते. याच दिवसाची सुरुवात झाल्यावर सकाळपासूनच ही जोडपी आपल्या वराडी मंडळींसह विवाह नोंदणीकृत कार्यालयात येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बहुतांश प्रेमीयुगुलांना हा मुहूर्त साधता आला नव्हता. त्यातच या वर्षी कोरोना आटोक्यात असल्याने मोठया प्रमाणात लग्नाचे बार उडविले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ती तितक्याच प्रमाणात दिसून आली नाही.या व्हॅलेंटाईन दिनाच्या मूहूर्तावर ४० जणांनी ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात आपले लग्न उरकून घेतले आहे. तर २०१८ मध्ये २३, २०१९ मध्ये ३५, आणि २०२० मध्ये २० प्रेमीयुगुलांनी आपल्या लग्नाचा बार उडविला होता. त्यातुलनेत ही संख्या कमी असल्याचे बोले जात आहे.
 १० फेब्रुवारीला अर्धशतक पार
यंदाच्या या व्हॅलेंटाईन वीक दरम्यान सुमारे १७५ प्रेमीयुगुलांचा नोंदणीकृत  विवाह पार पडला. ८ फेब्रुवारीला ३८ , ९ फेब्रुवारी रोजी १४, १० फेब्रुवारीला सर्वाधिक ५१ तर ११ फेब्रुवारीला ३० तर १४. फेब्रुवारी या प्रेमदिनी ४० प्रेमीयुगुलांनी नोंदणी पध्दतीने लग्न केले.  १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी शनिवार रविवार आल्याने सुट्टी होती. गेल्यावर्षी व्हॅलेंटाईन वीक दरम्यान सुमारे ९९ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले होते.