प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी मुदत 31 जुलै

ठाणे जिल्ह्यात पिकांसाठी महसूल मंडळ अधिसूचित

Mp farmer

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम 2022 करिता या योजनेत सहभागाची अंतिम मुदत येत्या 31 जुलै 2022 असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात भात पिकाकरीता अधिसूचित 41 महसूल मंडळांमध्ये तर नाचणी पिकाकरीता अधिसूचित 17 महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.

ठाणे जिल्ह्याकरिता शासनाकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. योजनेत सहभागी शेतकर्‍यांना हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पेरणी न होणे, पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वादळ, चक्रीवादळ, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे.

या योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ िाषलू.र्सेीं.ळप किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळ यावरुनही ऑनलाईन अर्ज करता येईल. पीकासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार, पिक लागवड नोंदणी प्रमाणपत्र, शेतकर्‍यांनी सातबारा उतारा, आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचे तपशील सोबत जोडणे आवश्यक आहे.

शेतकरी बांधवांनी शासनाच्या पीक विमा संकेतस्थळावरून, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून, नजीकच्या सेतू केंद्रातून वैयक्तिकरित्याही योजनेत सहभागी होऊ शकतात. यंदाच्या खरीप हंगामात भात व नागली लागवड करणार्‍या शेतकरी बांधवांनी योजनेत सहभाग घेतल्यानंतर ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पिक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे.

यंदा जनसुविधा केंद्र शेतकर्‍यांना पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सुलभता यावी व बँकामधील गर्दी टाळावी याकरिता जनसुविधा केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. जनसुविधा केंद्रामार्फत पीक विमा अर्ज दाखल करण्याकरीता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. शेतकर्‍यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.