घरठाणेजिल्ह्यात सरासरी १.०० मिमी बरसला अवकाळी पाऊस

जिल्ह्यात सरासरी १.०० मिमी बरसला अवकाळी पाऊस

Subscribe

मंगळवारी सकाळीच ढगांच्या गडगडाटात ठाणे जिल्हयात अवकाळी पावसाचे पुन्हा एकदा हजेरी लावली. अवघ्या तीन तासात जिल्ह्यात एकूण ०७.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सरासरी ०१.०० मिमी पाऊस झाला. विशेष म्हणजे उल्हासनगर तालुक्यामध्ये पावसाची नोंद ०.० इतकी झाली आहे. तर सर्वाधिक ठाणे तालुक्यात १३.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे वातावरणात सकाळी चांगला गारवा जाणवत होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट होऊन पावसाळा सुरुवात झाली. हा पडलेला अवकाळी पाऊस मात्र पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाप्रमाणे बरसल्याचे दिसून आले. ठाणे शहरात सकाळच्या पहिल्या तीन तासात म्हणजे सकाळी सहा ते आठ या वाजण्याच्या कालावधीत शहरात ०८.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मार्च महिन्यात शहरात आतापर्यंत ०९.८६ मिमी पाऊस बरसल्याची नोंद झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी शेतकरी वर्गाचे मात्र नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात पडलेल्या पावसामुळे पावसाळा सुरू झाला की काय अशी चर्चा रंगताना दिसून आली.पहिल्या एक तासात ०६.१० मिमी तर त्यानंतरच्या प्रति तासाला प्रत्येकी ०१.०० मिमी पाऊस पडला आहे. सकाळी पाऊस सुरू झाल्याने शाळकरी मुलांसह पालकांची चांगली धावपळ झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळेत न जाता घरी राहणे पसंत केल्याचे दिसून आले.
ठाणे तालुक्यात सर्वाधिक पाऊस
ठाणे जिल्ह्यात एकूण ७.६० पावसाची नोंद झाली. सरासरी ही नोंद १.०० मिमी झाली आहे. सर्वाधिक १३.४० मिमी पाऊस ठाणे तालुक्यात झाला असून त्यापाठोपाठ भिवंडी १२.००, अंबरनाथ ९.४०, कल्याण ५.१०, शहापूर ११.१०, मुरबाड १.०० मिमी पाऊस पडला. मात्र उल्हासनगर तालुक्यात पावसाची नोंद ही ०.० मिमी नोंदवली गेली आहे.

- Advertisement -

गडकरी रंगायतनच्या आवारात झाड पडले
ठाणे: तलावपाळी या ठिकाणी असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या आवारातील एक झाड दुसऱ्या झाडावर पडल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. कोसळलेल्या झाडामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, ठाणे या कार्यालयाच्या बाथरूमचा पत्रा फुटून थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुळापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत,कोसळलेले  झाड कापून बाजूला केले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -