ठाणे : भिवंडी, काल्हेर येथून ठाणे स्टेशनकडे प्रवासी घेऊन निघालेली रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास साकेत रोड, पोलीस मैदान जवळ घडली. या घटनेत रिक्षाचालक आणि पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. जखमींमध्ये एका 4 वर्षीय मुलीचा समावेश आहे. (The driver got dizzy while driving the rickshaw; 6 people injured in auto overturn)
रिक्षाचालक शिवकुमार जयस्वाल यांना रिक्षा चालवत असताना चक्कर आल्यामुळे त्यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रिक्षाचालक जयस्वाल हे शुक्रवारी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास प्रवासी रिक्षांमध्ये पाच प्रवासी घेऊन भिवंडी, काल्हेर येथून ठाणे स्टेशनकडे निघाला होता. साकेत रोड येथील पोलीस मैदान जवळ येताच, जयस्वाल यांना चक्कर आल्याने त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा उलटली. या अपघाताची माहिती ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य अशोक गुप्ता यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस कर्मचारी व शहर वाहतूक विभागाच्या कर्मचारी धाव घेत, या घटनेमधील जखमी झालेल्या सहा जणांना उपचार करण्यासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, येथे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीकडून आणखी एका संभ्रमात भर; 9 आमदारांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे मागणी
जखमींमधील रिक्षाचालक जयस्वाल यांना डाव्या खांद्याला व डोक्याला मार लागला आहे. तर चार वर्षीय सृष्टी हिच्या डोक्याला मुक्का मार लागला आहे. तिची आई शितल पाटील यांच्या मानेला मुक्का मार लागला आहे. स्नेहल मिश्रा यांच्या उजव्या हाताला, यश पाटेकर यांच्या डोक्याला व डाव्या खांद्याला आणि विकास सिंग यांच्या डाव्या खांद्याला मुक्का मार लागला आहे. तसेच अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
हेही वाचा : राजकारणाची व्याख्या सांगत गडकरी म्हणाले सध्या सुरू आहे ते…; आता या विधानाची होतेय चर्चा
हे झाले जखणी
या अपघातात रिक्षाचालक जयस्वाल (50) यांच्यासह भिवंडी काल्हेर येथे राहणारे सृष्टी सचिन पाटील (04) तिची आई शितल (30), यश पाटेकर (29), स्नेहल मिश्रा (27) आणि विकास सिंग असे सहा जण जखमी झाले आहेत.