छटाकसुद्धा वीजबिल कमी केले नाही; आमदार रविंद्र चव्हाण यांचा हल्लाबोल

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल या सर्वांनी जी फसवेगिरी चालवली आहे, ती भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सर्व विषय लोकांपर्यंत पोहोचवतील, अशी मला खात्री आहे, असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. अंबरनाथमधील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

कोरोना काळामध्ये वाढती वीज बिलं कमी करू, असे महाविकास आघाडी सरकारने वारंवार सांगितले. परंतु एका छटाक पैसासुद्धा या सरकारने कमी केलेला नाही. याउलट महाराष्ट्रामध्ये कुठेतरी विषयाला बगल देऊन जनतेची दिशाभूल कशी करता येईल, यासाठी गॅस, पेट्रोल-डिझेलची दरवाढ आंदोलनातून केली जाणारी फसवेगीरी सत्ताधार्‍यांनी आता थांबवावी. वास्तविक इतर राज्याप्रमारे दर कमी करू शकतो. परंतु हेतूपुरस्सर केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. जवळपास १५ हजार कोटीपेक्षा जास्त नफा या पेट्रोल-डिझेल करामुळे राज्य सरकारला मिळत आहे. त्याचा फायदा राज्यातील लोकांना द्यायचा नाही. मात्र निव्वळ फसवी आश्वासने देऊन लोकांना भाग पाडायचे, एवढेच काम सध्या सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल या सर्वांनी जी फसवेगिरी चालवली आहे, ती भाजपा जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सर्व विषय लोकांपर्यंत पोहोचवतील, अशी मला खात्री आहे, असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. अंबरनाथमधील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

माघी गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर अंबरनाथमध्ये पूर्व-पश्चिम भागात सोमवारी सायंकाळी भाजपचे महाराष्ट्र् प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण युवा जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई यांच्या हस्ते वॉर्ड क्र. ३८ मध्ये माजी नगरसेविका रोहिणी भोईर, शिवधाम येथे वॉर्ड क्र. ३३ मध्ये भाजपा शहर उपाध्यक्ष महेश मोरे, वॉर्ड क्र. ३२ कानसई येथे एकनाथ चौधरी व पश्चिम भागातील बुवापाडा येथे पुजा रणदिवे यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस भरत फुलोरे, संजय आदक, संतोष शिंदे, अंबरनाथ पुर्व मंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटील, पश्चिम मंडळ शहराध्यक्ष राजेश कौठाळे, सरचिटणीस दिलीप कणसे, विश्वास निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक गुंजाळ, राजु कुलकर्णी, दिपक कोतेकर, अजित खरात, सुधाकर जाधव, सुरेश जाधव, नितीन परब, प्रविण महाजन, मनिष गुंजाळ, हिरालाल गुप्ता, लालमन यादव, जोसेफ लोपेज, मधु आंबेकर, युवा मोर्चा पंकज चोळेकर,प्रजेश तेलंगे, युवती अध्यक्ष रूपाली लठ्ठे, उज्वला कबरे आशा देशमुख, माजी नगरसेविका कल्पना गुंजाळ, पुनम जाधव, शितल फर्नाडिस, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच अंबरनाथ शहरामध्ये भाजपाचे वादळ दिसत असून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षात तरुणांचा प्रवेश वाढत आहे. त्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. गेल्या पंचवीस वर्षात अंबरनाथ शहर हायटेक विकासापासून दुरावले आहे. म्हणून अंरनाथमध्ये भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त मशाल भाजपने हाती घेतली आहे. जोपर्यंत भय-भ्रष्टचारमुक्त अंबरनाथ होत नाही, तोपर्यंत शांतता नाही. याचा अर्थ लोकमतातून यावेळेस अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार, असा विश्वास भाजप महाराष्ट्र् प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला.

भाजप-मनसे युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील

भाजपा शतप्रतिशत दिशेने पदधिकारी व कार्यकर्ते हे निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र भाजपा-मनसे युती बाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. येणार्‍या काळामध्ये जी रणनिती भाजपाचे नेतृत्व ठरवेल त्या नितीप्रमाणे आम्ही सर्वजण एक दिलाने काम करू. पण एक गोष्ट खरी की, अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत जी एकत्र मंडळी आहेत. ती ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतेय, त्या सर्व प्रश्नांना खर्‍या अर्थाने वाचा फोडण्याचे काम इथे असलेला भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी निश्चित करेल, असा विश्वास आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे मिशन ३५ असे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर पुन्हा एकदा भर दिला. दरम्यान भाजप-मनसे युती होणार आहे का? याबाबत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही गोंधळाचे वातावरण नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 हेही वाचा –

धक्कादायक! मुलीचे दुःख विसरण्यासाठी ‘त्याने’ केलं परक्या मुलीचे अपहरण