ठाण्यातील पंचतारांकित टीपटॉप प्लाझा हॉटेलच्या जेवणात सापडली अळी

गणेश कुरकुंडे

ठाण्यातील नामांकित समजल्या जाणाऱ्या टीप-टॉप प्लाझा हॉटेलमध्ये जेवणात अळी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये असा प्रकार घडल्याने उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी दुपारी याच हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर ठाण्यातील एका कुटुंबाचा लग्न सोहळा होता. याच लग्नानंतर पाहुणे जेवत असताना एका लहान चिमुकलीच्या जेवणामध्ये अळी आढळून आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. किरण सोनवणे यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रिकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याबाबत हॉटेल व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

याच पार्श्वभूमीवर कुटुंबाने हॉटेल प्रशासनाकडे तक्रार केली असता घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर व्यवस्थापक यांनी माफी मागितली असल्याचे उपस्थित असलेले किरण सपकाळ यांनी सांगितले. मात्र हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे लग्न सोहळ्याला आलेल्या मंडळींनी सांगितले. ठाण्यातील तीन हात नाका जवळच असलेल्या टीपटॉप प्लाझा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अनेक कलाकार, अनेक पक्षातील मोठे नेते मंडळी येतात. अनेक कार्यक्रम या हॉटेलमध्ये होत असतात उत्तम शाकाहरी म्हणून देखील हे हॉटेल प्रसिद्ध आहे. मात्र शनिवारी लग्न समारंभ दरम्यान जेवणात अळी सापडल्याने ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’, असे म्हणावे लागेल.

एकीकडे लॉकडाऊन असताना हॉटेल व्यवसाय तोट्यात आहेत. मात्र ठाण्यातील पंचतारांकित समजल्या जाणाऱ्या टीपटॉप प्लाझा सारख्या हॉटेलच्या जेवणात अळी सापडण्याचा प्रकार घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच हॉटेल मध्ये मोठं मोठे कलाकार, अभिनेते विविध पक्षातील नेते मंडळी येतात. मात्र अशा घटनेने किती विश्वास ठेवावा हेच या प्रकारामुळे सिद्ध होत आहे. दरम्यान, अशा मोठ्या हॉटेलच्या जेवणात अळी आढळल्याने निष्काळजीपणा उघड झाला असल्याचे यावेळी किरण सोनवणे यांनी सांगितले.

हेही वाचा –

जयजित सिंग एटीएस प्रमुख; देवेन भारती सुरक्षा महामंडळावर