घरठाणेभिवंडीतील वणवे थांबेनात

भिवंडीतील वणवे थांबेनात

Subscribe

वनसंपदेची हानी

गेल्या काही दिवसांपासून भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रात वणवे लागल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेकडो हेक्टर जंगले जळून खाक झाले आहे. या वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनसंपत्ती असलेल्या भिवंडी तालुक्यातील सर्व वनपरिक्षेत्रातील डोंगरांना मानवनिर्मित आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे.

शिकारीसाठी, कोळसा मिळविण्यासाठी आणि गवतामधील प्लॉट मोकळे व्हावे आदी कारणांसाठी काही जण या आगी लावत आहेत. परंतु आगीमुळे जंगलातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचबरोबर जंगलातील लहान प्राणी, सरपटणारे लहान जीव आदी वन्यप्राणी आणि मौल्यवान झाडे यांचा बळी पडत आहे. विशेष म्हणजे भिवंडी तालुक्यातील सर्व जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आहेत. परंतु या आगींमुळे मौल्यवान वनस्पती आणि वन विभागाने लावलेली झाडे नष्ट होत आहेत. वनविभागाचे अधिकारी डोंगर भागातील गावांमध्ये जाऊन या प्रकरणी जनजागृती केली. मात्र त्यानंतरही आगी लावल्या जात आहेत.

- Advertisement -

पारीवली, पडघा, दुगाड, चिंबीपाडा, पिलंझे, कुहे, दिघाशी, गणेशपुरी, कांबा आदी सर्व वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून याआगी लागत आहेत. दुगाड वनपरिक्षेत्रात वज्रेश्वरी जवळील गुमतारा किल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी मोठी आग रात्री नऊ वाजेच्या सुमारास लागली. येथील वनपाल सुधीर फडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन रात्री एक वाजेपर्यंत जीवाची पर्वा न करता ही आग आटोक्यात आणली. परंतु वन कर्मचारी यांच्याकडे या आग आटोक्यात आणण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने आणि डोंगरावर उपलब्ध साधने नेऊ शकत नसल्याने त्यांच्यावर मर्यादा येत आहेत.

या आगी रात्रीच्या वेळेस लावण्यात येतात आणि आम्ही तिथे पोहचेपर्यंत आगीने मोठया प्रमाणात पेट घेतलेला असतो. यामुळे नागरिकांनीही जागरूक राहून वन विभागाला सहकार्य करावे”
– सुधीर फडके, वनपाल दुगाड वनपरीक्षेत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -