घर ठाणे पात्र लाभार्थ्यांना होणार अनुदानाचे गणेशोत्सवापूर्वी वाटप

पात्र लाभार्थ्यांना होणार अनुदानाचे गणेशोत्सवापूर्वी वाटप

Subscribe

ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत महिला व बालविकास योजनेच्या माध्यमातून विविध योजनांमध्ये पात्र ठरलेल्या १ हजार ५१८ लाभार्थी महिलांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे शुक्रवारी केली होती. त्याच्यावर आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही केल्याने अनुदान वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठामपा मार्फत विविध राबविल्या जातात. या योजनांमध्ये ६० वर्षावरील विधवा तसेच घटस्फोटित आर्थिक दुर्बल घटकातील ज्येष्ठ महिलांना अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी एकूण १४ हजार ९५२  तर कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कर्त्या पुरूषाचे निधन  होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्य या योजनेसाठी एक हजार ५१८ इतके अर्ज प्राप्त झाले आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान देण्याचे आयुक्त बांगर यांनी मान्य केले असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, रमाकांत मढवी, माजी नगरसेविका मिनल संख्ये आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील गरीब व गरजू महिलांना या योजनांचा लाभ मिळणार असून आयुक्त बांगर यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल नरेश म्हस्के यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -