घरठाणेठाणे जिल्ह्यातील महिलांचा ‘लालपरी’तून प्रवास सुसाट

ठाणे जिल्ह्यातील महिलांचा ‘लालपरी’तून प्रवास सुसाट

Subscribe

तीन दिवसात 77 हजार महिलांची पसंती

राज्य सरकारने एसटीमधून प्रवास करणार्‍या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणारा अध्यादेश काढला आणि शुक्रवारपासून (17 मार्च) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलतीची सवारी सुरु झाली. ठाणे जिल्ह्यातील महिला ही लालपरीतून सुसाट प्रवास करताना दिसून लागल्या आहे. अवघ्या 17 ते 19 मार्च या तीन दिवसात एसटीच्या ठाणे विभागातून जवळपास 77 हजार महिलांनी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे रविवारी ही महिलांची एसटीला गर्दी पाहण्यास मिळाली आहे. तसेच या तीन दिवसांचा आलेख पाहता, तो वधालेलाच दिसत आहे. यामध्ये आकडेवारीवरून पहिल्या क्रमांकासाठी मुरबाड आणि भिवंडीतील महिला वर्गाची जणू स्पर्धा पाहण्यास मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागांतर्गत एकूण आठ आगार येतात. त्या आठ विभागांमध्ये गेल्या तीन दिवसात 76 हजार 857 महिलांनी त्या सवलतीचा लाभ घेतल्याची दिसत आहे. 17 मार्च ठाणे जिल्ह्यात 13 हजार 419 महिलांना 50 टक्के सवलतीचे दिले गेले. मात्र दुसर्‍या म्हणजे 18 मार्चला त्या दिवसभराचा आकडा 29 हजार 913 महिलांनी प्रवास केल्याने तो आकडा दुप्पटीहुन अधिकने वाढला. परंतू, तिसर्‍या दिवशी रविवारी असल्याने ती संख्या कमी होईल असे वाटले होते. पण रविवारी ही प्रवास करणार्‍या महिलांची संख्या ही 33 हजार 525 वर पोहोचली होती. या दिवशी ही पहिल्या दिवसांच्या तिपट्टीहुन अधिक महिलांनी लालपरीला पसंती दिल्याचे पाहण्यास मिळाले. या सवलतीचा पहिल्या तीन दिवसात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांनी अधिक लाभ घेतल्याचे आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. या सवलतीमुळे तीन दिवसात ठाणे विभागाच्या तिजोरीत उत्पन्न रुपात 19 लाख 76 हजार 171 रुपयांची भरच पडली आहे.

- Advertisement -

चार आगारातून 11 हजारांहून अधिक महिलांचा प्रवास
आठ आगारांपैकी भिवंडी आणि मुरबाड या आगारात पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा दिसली. सर्वाधिक 12 हजार 575 महिलांनी नव्या सवलतीनुसार प्रवास केला. त्या पाठोपाठ भिवंडी 12 हजार 427, ठाणे (1) 11 हजार 858 आणि शहापूर 11 हजार 595 महिलांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील कल्याण आगारातून प्रवास करणार्‍या महिलांची संख्या इतर आगरांपेक्षा सर्वात कमी आहे. ती संख्या 6 हजार 174 इतकी आहे. वाडा 8 हजार 358, ठाणे (2) 7 हजार 281 आणि विठ्ठल वाडी आगारातून 6 हजार 590 महिला या सवलतीच्या लाभार्थी ठरल्या आहेत.

ठाणे एसटी विभागातील सर्वाधिक प्रवास करणार्‍या मुरबाड आणि सर्वात कमी प्रवास करणार्‍या कल्याण आगारातून शनिवार पेक्षा रविवारी महिलांची संख्या कमी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र इतर आगारात शनिवारपेक्षा रविवारी जास्त महिलांनी प्रवास केल्याचे दिसत आहे. मुरबाड मध्ये शनिवारी 5 हजार 518 महिलांनी सवलतीचा लाभ घेतला. मात्र रविवारी ती संख्या 4 हजार 161 वर आली. तर कल्याणमध्ये शनिवारी 2 हजार 607 महिलांनी सवलतीचा लाभ घेतला. मात्र रविवारी ती संख्या 2 हजार 598 वर आल्याचे दिसले. शहापूर आगार साडले तर इतर आगारात शनिवारपेक्षा रविवारी एक हजारांनी महिला प्रवासी संख्या वाढली. शहापूर अवघी 8 महिला प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -