घरठाणेटिटवाळ्यातील वरप येथील कोविड सेंटर अखेर सुरू

टिटवाळ्यातील वरप येथील कोविड सेंटर अखेर सुरू

Subscribe

ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा उपयोग घेता येणार

गेल्या वर्षापासून वैद्यकीय उपकरणांनी सुस्थित निर्माण केलेले कल्याण तालुक्यातील रखडलेले वरप येथील राधास्वामी सत्संग कोरोना सेंटर रविवारपासून सुरू करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा उपयोग घेता येणार आहे. कल्याण तालुक्यातील गाव, पाडे व इतर खेडेगावातील कोरोना रुग्णांची गेल्यावर्षी आसपास उपचाराकरता रुग्णालय नसल्याने मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत त्यांना वेळेनुसार बेड देखील उपलब्ध न झाल्याने अनेकांचे या महामारी जीव गेले होते. यामुळे ग्रामीण भागातील सर्वच राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांनीही वरप येथे कोविड सेंटरची मागणी केली होती. वरप ग्रामपंचायत हद्दीतील राधास्वामी सत्संग येथे कोरोना सेंटर उभारण्याचे निश्चित होते. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांकरता हे सेंटर उभारण्याचे सुरू असतानाच उल्हासनगर येथील कोरोना रुग्णांना देखील येथे उपचार मिळणार असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाल्याने त्यांनी याबाबत विरोध दर्शविल्याने सुस्थितीत उभारलेले हे सेंटर गेल्या वर्षभरापासून धूळखात पडून होते.

 

- Advertisement -

राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून ग्रामीण भागातही शेकडो रुग्ण आढळू लागले आहेत. वरप येथील राधास्वामी सत्संग कोरोना रुग्णांसाठी तयार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्रकार संजय कांबळे यांच्याकडून समजली असता त्यांनी हे कोविड सेंटर रुग्णांकरता सुरू केले आहे. सुमारे दोनशे बेडची क्षमता असलेल्या या सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात शंभर बेड सुरू करण्यात आले आहे. यातील 10 बेड ऑक्सीजन युक्त असून बाकी रुग्णांवर उपचार होणार आहेत.

 

- Advertisement -

ज्या रुग्णांना अति त्रास होत असल्यास अशा रुग्णांना ठाणे सिव्हिल तसेच पडघा जवळील सावज नाका येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाणार आहे. सध्या या सेंटरसाठी सहा वैद्यकीय अधिकारी, सात नर्स, वॉर्डबॉय सह सुरक्षारक्षक दिले गेले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांकरता कोरोना बाबतच्या सर्व चाचण्या होणार असून तसेच लसीकरण केंद्र देखील सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत मासाल यांनी दिली आहे. या सेंटर साठी पालक मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे व अन्य अधिकारी वर्गाचे मोठे योगदान लाभले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -