Eco friendly bappa Competition
घर ठाणे वैद्यकीय महाविद्यालय दुसऱ्या जागेत लवकरच होणार स्थलांतरित

वैद्यकीय महाविद्यालय दुसऱ्या जागेत लवकरच होणार स्थलांतरित

Subscribe

कळवा रुग्णालयाची क्षमता दुप्पटीने वाढेल

एकीकडे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होण्यासाठी नुकतेच भूमिपूजन झाले आहे. त्यातच आता ठाणे महापालिकेनेही स्वतःच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बेड्सची क्षमता वाढविण्याबाबत विचार करून ही क्षमता वाढविण्यासाठी महापालिकेने रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालय दुसऱ्या जागेत स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या जागी सध्याच्या बेड्ससंख्या दुप्पटीने वाढणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय माजीवडा येथील ५ आणि १२ मजली इमारतीत होणार आहे. येत्या सहा महिन्यात हा प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता महापालिका सूत्रांनी वर्तवली आहे.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर कळवा  रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभाग तयार केले. त्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याशिवाय, रुग्णालयात वाचनालयही सुरु करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ रुग्ण उपचारासाठी खाटांची संख्या वाढविण्यासाठी आयुक्त बांगर यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या रुग्णालयाच्या इमारतीत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु  आहेत. माजिवाडा येथे पालिकेच्या ५ मजली आणि १२ मजली अशा दोन इमारती आहेत. यामध्ये हे महाविद्यालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यापैकी एका इमारतीत पालिकेची वैद्यकीय प्रयोगशाळा आहे. या दोन्ही इमारतींमध्ये महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्थलांतरीत करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यानंतर या स्थलांतरणामुळे मोकळ्या होणाऱ्या रुग्णालयातील महाविद्यालयाच्या जागेवर रुग्ण उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. रुग्ण उपचारासाठी सुमारे पाचशे खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. महाविद्यालय स्थलांतरित करणे आणि रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे काम पालिका प्रशासनामार्फत सुरु आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -