Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे बेपत्ता मुलींचा तातडीने शोध लावण्यात यावा-आयलानी

बेपत्ता मुलींचा तातडीने शोध लावण्यात यावा-आयलानी

Subscribe
  उल्हासनगर शहरातून अचानक पाच  मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले असून या बाबत  मुलींचे पालक विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व अन्य  धार्मिक संघटनेने लव्ह जिहाद चे प्रकरण सांगून या प्रकरणाची कसून चौकशी चीं मागणी केली आहे. उल्हासनगरात  गुन्हेगारी शिगेला पोहचली असताना त्यात एकाच आठवड्यात पाच  मुली गायब होण्याच्या घटना घडल्याने पालक चिंतीत झाले आहे, या पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांकडून प्रतिसाद  मिळत नसल्याचा आरोप सिंधू युथ सर्कल सभागृहात आयोजित एका करण्यात बैठकीत करण्यात आला.  या बैठकीत आमदार कुमार आयलानी, भाजपा नेते नरेंद्र राजांनी, भाजपा अध्यक्ष जमनू पुरुसवानीमाजी स्थायी समिती अध्यक्ष राजेश वधारिया, माजी नगरसेवक प्रदीप रामचंदनी, सिंधू शर्मा, निखिल गोळे, परमानंद गेरेजा आणि अजित सिंग लबाना समवेत विविध सामाजिक संघटने चे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मुलींना फूस लावून पळवून नेत असल्याचा आरोप बेपत्ता असलेल्या  मुलींच्या आई वडिलांनी  केला आहे, तर मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलो असता निनावी नंबर वरून मला तक्रार का केली असे विचारण्यात येऊन माझ्या सुनेला पळवून नेण्याची धमकी फोन वरून एका  अज्ञात इसम देत आहेत, मी कोणाला फोन करतो , कुठे जातो हे देखील फोन करणाऱ्याला माहीत असते याचा अर्थ माझा फोन टॅप केला जात असल्याचा आरोप एका मुलीच्या पालकाने केला आहे.
 हा प्रकार गंभीर  असून शहरातील दुकाने, कारखाने, हॉटेल, लॉज येथे कामावर असलेले कामगार यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड तपासून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्वरित कारवाई करण्यात यावी , अशा लोकांना कामावर ठेऊन नये असे आवाहन आमदार कुमार आयलानी यांनी केले आहे.  या घटना अत्यंत धक्कादायक आहेत त्याचप्रमाणे या संदर्भात मुलींचे पालक तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस अधिकारी सहकार्य करीत नाहीत असा आरोप होत आहे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आयलानी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -