घरठाणेस्ट्रॉबेरी या नव्या पीकाने जिल्ह्याची ओळख बदलतेय

स्ट्रॉबेरी या नव्या पीकाने जिल्ह्याची ओळख बदलतेय

Subscribe

१० ते १५ शेतकऱ्यांचा प्रयत्नांचे कौतुक

स्ट्रॉबेरी म्हटले म्हटले तर आवर्जून महाबळेश्वर हे नाव प्रत्येकाच्या मुखी येत. त्यातच, स्ट्रॉबेरी सारख्या पिकाला ठाणे जिल्ह्यात पूरक वातावरण नसताना ही काही प्रयोगशील शेतकरी स्ट्रॉबेरीसारखे पीक घेत असल्याने जिल्ह्यासह मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणच्या मोठया बाजारपेठेत आता ताजी स्ट्रॉबेरी उपलब्ध होऊ लागली आहे. तसेच तांदूळ, भेंडी आणि ढोबळी मिर्ची यासारख्या निर्यातदार पिकांबरोबर स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्याची ओळख ही हळूहळू बदलाच्या दिशेकडे घेऊन जात आहे. सध्या १० ते १५ प्रगत शेतकऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाने इतर शेतकऱ्यांना नक्की नवसंजीवनी मिळणार आहे.

भविष्यात जिल्ह्यातील इतर स्ट्रॉबेरी सारखी इतर पीक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. सात तालुक्याच्या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे मुरबाड, शहापूर या तालुक्यात ग्रामीण भाग जास्त आहे. तर, कल्याण,भिंवडी, अंबरनाथ या तालुक्यातील काही भाग ग्रामीण आहे. तर काही भाग शहरी झाला आहे. त्यातच, ठाणे आणि उल्हासनगर हे तालुके शहरी कारणाने वेढले गेले आहेत. या जिल्ह्यात जे काही क्षेत्र आहे ते शेतीचे क्षेत्र आहे. त्या क्षेत्रात शेतकऱ्यांकडून शेतीचे नवनवीन प्रयोग करून ते यशस्वी करण्यावर भर देत आहे. मध्यंतरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील भेंडी आणि ढोबळी मिर्ची हे पिके घेतली गेली. त्याची ख्याती सर्वदूर आहे. विशेष म्हणजे ढोबळी मिर्ची ही हिरवी नाहीत, लाल आणि पिवळया रंगातील पिकेही ठाण्यात घेतली जात आहे. त्याचबरोबर मत्सशेतीचा देखील प्रयोग ठाणे जिल्ह्यात करण्यात येत आहे. त्यातच थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीचा स्वाद ठाणे आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना घेता यावा यासाठी, त्याचे पीक घेण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धाडस केले.

- Advertisement -

गतवर्षी ३ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यानंतर ही संख्या यंदा १० ते १५ झाल्याने स्ट्रॉबेरी साठी शेतकऱ्यांचा पुढाकार वाढल्याचे पाहण्यास मिळाले आहे. ती भविष्यात आणखी वाढ असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याना नव नवीन शेतीचे प्रयोगाची माहिती व्हा शेतकरी जागृत झाला पाहिजे, यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या माध्यामतून कृषी विभागाच्या भेटी सहल प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील होत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे.

कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे फळ
स्ट्रॉबेरी लागवड केल्यावर दोन महिन्यांनंतर ही वेल उत्पन्न द्यायला सुरू करते व वर्षातून चार ते आठ महिने उत्पन्न देते. घाऊक बाजारपेठेत या फळाला चांगला भाव देखील मिळत आहे. या फळामध्ये व्हिटॅमिन सी, आरोग्यवर्धक आणि अंटी ऑक्सिडट असते. हे शुगरफ्री फळ असल्याने याला मागणी जास्त आहे. त्यातच, कमी खर्चात कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे फळ आहे.

- Advertisement -

या तालुक्यात होतेय लागवड
जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील गुरुनाथ सांबरे या शेतकऱ्याने देखील त्यांच्या शेतीत स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड केली असून त्यांनी यशस्वी केला आहे. त्यानंतर, अंबरनाथ तालुक्यातील बेंडशिळ आणि चिकणीची वाडी आणि म्हसा या ठिकाणी देखील स्ट्रॉबेरीचे पिक घेतले जात. कोणी एक ते दोन गुढ्यांमध्ये तर कोणी 30 गुढ्यांमध्ये हे पीक घेत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आता अभ्यासू झाला आहे. त्यामुळे तो नवनवीन प्रयोग करत आहेत. गतवर्षापासून जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यास सुरुवात झाली. यावर्षी ही संख्या वाढून ती १० ते १५ इतकी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात स्ट्रॉबेरीसाठी पूरक वातावरण नसले तरी त्याची काळजी घेतल्यास हे पीक आपल्याकडे येऊ शकते. तसेच हे पीक घेणे एकप्रकारे रिस्क घेण्यासारखे आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रयोग केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो. पण या पिकांमुळे ठाणे, पुणे या जिल्ह्यासह मुंबईकरांना ताज्या स्ट्रॉबेरीचा नक्की स्वाद घेता येणार आहे.
– अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -