ठाणेकरांना दिलासा

कोरोना रुग्ण संख्या १,९०० घटली

What happens if both Corona and Influenza infections occur at the same time? Read the answer to 'WHO'
Corona आणि Influenza दोन्हीचे संक्रमण एकदाच झाले तर काय होईल ? वाचा 'WHO'चे उत्तर

रविवारी ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ९ हजारांचा टप्पा गाठला असताना, सोमवारी ही संख्या जवळपास १ हजार ९०० ने घटल्याने बांधितांचा आकडा ७ हजार २०९ वर आला आहे. तर दोघे दगावले आहे. सर्वाधिक ठाणे महापालिकेच्या हद्दीत कोरोना बाधितांची संख्या २ हजार ३०७ इतकी आहे. सर्वात कमी रुग्ण संख्या भिवंडीत १२६ इतकी आहेत.

सोमवारी नोंदविण्यात आलेल्या ७ हजार २०९ रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ही सहा लाख २८ हजार १६३ झाली आहे. त्यामध्ये ठामपा मध्ये २ हजार ३०७ रुग्ण नोंदवली गेली. नवीमुंबईत एक हजार ९२४ रुग्ण आढळून आले आहेत. केडीएमसीत १ हजार १४२ रुग्ण, उल्हासनगर २८३, भिवंडीत १२६, मीरा भाईंदर ८२७, अंबरनाथ २०५   ,कुळगाव बदलापूर १३०  ,ठाणे ग्रामीण २६५ रुग्ण आढळून आलेले आहेत. अंबरनाथ आणि कल्याण डोंबिवलीत प्रत्येकी एक जण दगावला आहे.