घरठाणेठामपात जून महिन्यात डेंग्यूची रुग्ण संख्या शून्य

ठामपात जून महिन्यात डेंग्यूची रुग्ण संख्या शून्य

Subscribe

मलेरियाची रुग्ण संख्या 28

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये मे प्रमाणे जून महिन्यात ही मलेरिया या आजाराचे एकूण 28 रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे डेंग्यूच्या संशयितांची संख्या 40 च्या घरात पोहोचली होती. पण निश्चित निदानात एकही डेंग्युचा रुग्ण आढळून आला नाही. यावरून डेंग्यूला वेळीच आळा बसला आहे.

ठामपा कार्यक्षेत्रात जून 2022 मध्ये डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदानात एकही रुग्ण आढळून आला नाही.तर मलेरियाचे 28 रुग्ण आढळून आले व चिकनगुनियाचे संशयित व निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य आहे.यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31, 427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरे दूषित आढळून आली.

- Advertisement -

तसेच एकूण 41,004 कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आली.याचदरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 2,194 ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी हॅण्डमशीनद्वारे 14, 765 ठिकाणी धूरफवारणी करण्यात आली, तसेच 03 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हुमरसकर यांनी नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -