ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या सात महिन्यात जरी १ हजार ६१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असला तरी, याचदरम्यान या रुग्णालयात ३ हजार २९९ बालकांनी जगात पाऊल टाकले आहे. पण, यातील १११ बालके हे मृतावस्थेत जन्माला आली. पण, उर्वरित ३ हजार १८८ बालके जीवित असल्याची सुखकारक बाब रुग्णालयाचा आकडेवारी दिसत आहेत. त्यामुळे एकीकडे एकाच रात्री झालेल्या १७ जणांचा मृत्युनंतर जरी रुग्णालय टीकेचे धनी होत असताना, दुसरीकडे जन्माला येऊन जग पाहणाऱ्या बालकांमुळे रुग्णालयातील सर्वच डॉक्टर किंवा कर्मचारी हे वाईटच आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री १७ जणांचा उपचारारदम्यान मृत्यू झाल्याने हाहाकार माजला. त्यामुळे सर्वच स्तरावरून रुग्णालय प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले. त्यातच येथील भोंगळ कारभार समोर आला. याशिवाय रुग्णालयात २०२३च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यात १ हजार ६१ जणांना मृत्यू झाल्याची बाब पुढे आली. एक हजार रुग्ण उपचारार्थ दाखल होत असतील तर सरासरी मृत्यूचा आकडा हा सात महिन्याला ४९ इतका असल्याचे शासकीय आकडेवारीत म्हटले आहे.
तर दुसरीकडे याच रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात शिशुची संख्या ही मृत्यू होणाऱ्या रुग्णांपेक्षा तिप्पट असल्याची बाब पुढे आली आहे. म्हणजे सात महिन्यात ३ हजार २९९ बालकांचा जन्म झाला असला तरी त्यातील १११ बालकांना हे जग पाहता आले नाही. पण, उर्वरित ३ हजार १८८ बालकांनी या जगात पाऊल टाकले आहे. ते हे जग येथील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांमुळे पाहत आहे. हेही तितकेच खरे आहे. असे त्या आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. तर गतवर्षीपेक्षा या वर्षी ५५ अधिक बालके रुग्णालयात जन्माला आली आहेत. त्यामध्ये ५ मृतावस्थेत तर ५० बालक सुखरूपपणे जन्माला आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बालकांचा जन्म तक्ता (२०२३)
महिना प्रसूती जिवित जन्मलेले बालक/ मृत जन्मलेले बालक
जानेवारी ५३७ ५१८/ १९
फेब्रुवारी ४१५ ४०२/१३
मार्च ४४४ ४३१/१३
एप्रिल ४७९ ४६०/१९
मे ५२१ ५०१/२०
जून ४४३ ४२६/१७
जुलै ४६० ४५०/१०
एकूण ३२९९ ३१८८/१११
नैसर्गिक पेक्षा सीझर प्रमाण अधिक
प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये नैसर्गिक प्रसूतीपेक्षा सीझर प्रसूतीचे प्रमाण ६१५ ने अधिक आहे. यामध्ये नैसर्गिक एक हजार ३२५ प्रसूती करण्यात यश आले आहे. पण दुसरीकडे एक हजार ९४० सीझर प्रसूती ही करून बाळ आणि मातेला वाचविण्यात यश आले आहे. असे या आकडेवारी दिसत आहे