घरठाणेयुक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा झाला ५४

युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा झाला ५४

Subscribe

बहुतांश एमबीबीएसचे विद्यार्थी

 रशिया आणि युक्रेनच्या युद्ध परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले ५४ विद्यार्थी हे  ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आता समोर आली आहे. यामध्ये बहुतांशी विद्यार्थी हे एमबीबीएसचे आहेत. ठाणे शहरासह मुरबाड,नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आदी शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 तर,अडकलेल्या मुलांमध्ये ठाणे शहरातील सर्वाधिक विद्यार्थी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारी वरून दिसून येत आहे. रशिया युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर भारतातील अनेकजण युक्रेनमध्ये अडकले आहेत. यात ठाणे जिल्ह्यातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासह इतर शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा शुक्रवारी आणि शनिवारी २४ होता.

- Advertisement -

तो रविवारी ५४ वर पोहोचला आल्याचे समोर आली. जिल्ह्यातील आणखी काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत का याची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहे. तसेच जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ या संपर्क क्रमांकावर आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे आवाहन करण्यात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -