घरठाणेलॉकडाऊनमध्ये महिलांना पेन्सिल कारखान्याचा आधार; समाजसेविका समीक्षा मार्कंडे यांचा पुढाकार

लॉकडाऊनमध्ये महिलांना पेन्सिल कारखान्याचा आधार; समाजसेविका समीक्षा मार्कंडे यांचा पुढाकार

Subscribe

तब्बल ५० पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या कुटुंबाचा गाडा खेचण्यासाठी एक आधार दिला आहे. आज या पेन्सिलच्या कारखान्यातून महिलांचा उदारनिर्वाह चांगल्या पद्धतीत सुरु आहे.

कोरोना महामारीचा फटका अख्या जगाला बसला आहे. या संकटाच्या काळात कोणाची नौकरी गेली, व्यावसाय बंद झाला  तर कोणाची रोजीरोटी बंद झाली. यामुळे हातावर पोट असलेल्यांवर  दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यातच लोकांना लॉकडाऊन असल्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी घरातच कोंडून राहावे लागत असल्याने उदरनिर्वाह होणार कसा ? या चिंतेत असलेल्या कोपरीतील गृहिणींना महिला समाजसेविका समीक्षा मार्कंडे यांनी मोठा आधार  दिला आहे. त्यांनी  पेन्सिल कारखान्याचा माध्यमातून हा आधार दिला आहे. या मदतीच्या हातामुळे बेरोजगार महिलांच्या  दोन वेळच्या जेवणाची चिंता संपली आहे.  सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समीक्षा मार्कंडे या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत.

महिलांच्या समस्या सोडविणे, त्यांना रोजीरोजगार मिळवून देणे अशी विविध सामाजिक कामे करीत असल्याने लॉकडाऊनमध्ये महिलांनी भेट घेऊन रोजीरोजगाराची समस्या मांडली होत्या. यावर पर्याय म्हणून स्वतः समीक्षा मार्कंडे यांनी वरिष्ठांशी चर्चा  करून कोपरीमध्ये पेन्सिल बनवण्याचा कारखाना सुरू केला आहे. तब्बल ५० पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या कुटुंबाचा गाडा खेचण्यासाठी एक आधार दिला आहे. आज या पेन्सिलच्या कारखान्यातून महिलांचा उदारनिर्वाह चांगल्या पद्धतीत सुरु आहे. समाजसेविका समीक्षा यांनी पेन्सिल बनविण्याची महागडी मशीन कर्ज घेऊन विकत घेतली आणि हा कारखाना चालू करून महिलांना पेन्सिलचे उत्पादन सुरु करून दिले. तर तयार होणाऱ्या पेन्सिलला बाजारपेठही मिळवून दिली. त्यामुळे कोपरीतील असंख्य महिलांच्या उदरनिर्वाहाचा पेन्सिल कारखाना हा आधार ठरला. महिलांनी मार्कंडे यांना धन्यवाद देत आभारही मानले.

- Advertisement -

“कोरोना काळात बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. मागच्या तीन महिन्यापासून  महिलांना विविध माध्यमातून रोजगार देत आहोत. आम्ही स्वतः लोन काढून ठाण्यात ४ मशीन खरेदी केल्या आहेत. त्या ठिकाणी १५ ते १६ महिला आपल्या शिफ्टनुसार काम करत आहेत. त्यातून आम्हाला २ लाख ५० हजार इतका खर्च आला आहे. महिलांचा प्रतिसाद पाहता आम्ही अजून अशीन मागवल्या आहेत. त्यामुळे काही लोकांना रोजगार दिल्याने आम्हाला आनंद आहे. हा उपक्रम असाच सुरू राहील.”
– समीक्षा मार्कंडे, समाजसेविका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -