घरठाणेपाण्यासाठी दिव्यातील नागरिकांचे हाल सुरू

पाण्यासाठी दिव्यातील नागरिकांचे हाल सुरू

Subscribe

वाढीव पाण्यासह मूळ पाण्यात कपात करत, जेमतेम २७ ते २८ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती सदस्यांनी सभागृहासमोर आणली.

उन्हाळा तोंडावर असताना, दिव्यातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याची धक्कादायक बाब मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समिती च्या बैठकीत समोर आली. एकीकडे एमआयडीसीने मूळ पुरवठ्यात ५ दशलक्ष लीटर पाणी वाढवून दिले होते. आता वाढीव पाण्यासह मूळ पाण्यात कपात करत, जेमतेम २७ ते २८ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती सदस्यांनी सभागृहासमोर आणली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी वाढीव पाण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती होऊ शकली नाही. पण, येत्या दोन दिवसात यावर बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

ठाणे महापालिकेचा एक भाग असलेला दिव्याची आजच्या घडीला लोकसंख्या पाच लाखांच्या घरात गेली आहे. दिव्यासाठी एमआयडीसीकडून यापूर्वी ३१.५० दशलक्ष लीटर रोज पाणी पुरवठा केला जात होता. तो कमी पडत असल्याने त्यात वाढीव मिळावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला होता. त्यानंतर कुठे एमआयडीसीकडून वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केल्याने दिव्याला ३६.५० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात होता.

- Advertisement -

परंतु मागील काही दिवसापासून वाढीव पाणी पुरवठय़ासह मुळ पाण्यातही कपात करण्यात आली असून ते पाणी सुध्दा वेळेवर मिळत नसल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. एमआयडीसीकडून हा प्रकार केव्हा बंद होणार आहे. नेमका किती पाणी कपात केली जात आहे, त्या मागची कारणे काय आहेत, याची उत्तरे त्यांनी यावेळी मागितली. तर स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील यांनी देखील मागील कित्येक दिवसापासून दिव्यातील नागरिकांना पाण्याचे हाल सोसावे लागत असल्याची माहिती दिली. त्यामुळे हा प्रश्न केव्हा सुटणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संदर्भात अतिरिक्त नगरअभियंता अजरुन अहिरे यांनी एमआयडीसीकडून मुळ पाण्यासह वाढीव पाण्यातही कपात करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे आता दिव्याला २७ ते २८ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत असल्याचे मान्य करत यासंदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक घेत मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -