ठाणे शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचे कंबरडे मोडले

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

गेल्या वर्षभरात ठाणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कारवाईचा टॉप गिअर टाकला आहे. त्यातच, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २५ प्रस्ताव तयार करत तब्बल १२१ जणांवर मोक्कांतर्गत कारवाईचा निशाण लावून टाकला. त्यामध्ये ६९ जणांच्या हाती बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे. तर पसार असलेल्या त्या ५२ जणांच्या माघावर पोलीस आहे. एकूण २५ कारवायीपैकी तब्बल २२ कारवाया फक्त कल्याण आणि उल्हासनगर या दोन परिमंडळांतर्गत करण्यात आल्या आहेत. या वरून तेथे संघटित गुन्हेगारी वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. याशिवाय वाढत्या सोनसाखळीच्या घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी ३३ सोनसाखळी चोरट्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी पुरेपूर केला आहे.

ठाणे शहरात संघटित गुन्हेगारी वाढीस लागल्याने पोलिसांनी वेळीच त्यांना पायबंद करण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाईचा बडगा उगारला. पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी कारवाईची मोहीमच हाती घेतली. १ जानेवारी २०२२ ते २७ जानेवारी २०२३ दरम्यान तब्बल २५ प्रस्ताव तयार केले. त्यामध्ये १२१ जणांवर मोक्कांतर्गत कारवाईचा ठपका ठेवला. याचदरम्यान ६९ जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले. तर पसार ५२ जणांचा शोध सुरू आहे. आतापर्यंतच्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासातील एवढी मोठ्या प्रमाणात केलेली वर्षभरातील ही कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

या कारवाईत प्रामुख्याने सोनसाखळी चोरट्यांना लक्ष करण्यात आले. त्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई हाती घेतली. तब्बल सोनसाखळी चोरट्याचे १५ प्रस्ताव तयार करण्यात आले. यामुळे कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळांतर्गत वाढलेल्या सोनसाखळी वेळीच आळा बसला, पण पूर्णपणे आळा बसला असे म्हणता येणार नाही असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे २० सोनसाखळी चोरटे पकडले गेले असून १३ जण अद्यापही पसार आहेत. अशा ३३ चोरट्यांवर मोक्कांतर्गत कारवाईत त्यांचे नाकेनऊ आणले आहेत. ठाणे शहर, भिवंडी आणि वागळे इस्टेट या परिमंडळात प्रत्येकी एक-एक प्रस्ताव तयार करण्यात आले असून १६ जणांना मोक्का लावला आहे. १० जण जेरबंद झाले असून ६ जण अद्यापही पसार आहेत. त्यांच्याही लवकरच मुसक्या आवळण्यात यश येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.या