घरठाणेजे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे - राज ठाकरे

जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे – राज ठाकरे

Subscribe

आता जे काही महाराष्ट्रातील राजकारण सुरूआहे ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे असल्याचा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यात सत्ताधार्‍यांसह विरोधकांना लगावला. याचबरोबर माझ्या वाट्याला गेल्यामुळेच मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले अशी टीका त्यांनी नाव न घेता, उद्धव ठाकरे यांच्यावर केली. सत्ता येते आणि जाते, हे आधीच्या सत्ताधा-यांनी आणि आताच्या सत्ताधा-यांनीही लक्षात घ्यावे, असा इशाराही ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गट आणि भाजपला दिला. तसेच सत्तेपासून आपण दूर नाही, मी आशा दाखवत नाही तर मला ते माहित आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी येत्या पालिका निवडणुकीनंतर महापालिकेत मनसे सत्तेत असणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना देत कामाला लागला असे म्हटले. याचदरम्यान त्यांनी कोणाचे वाभाडे आणि कोणाला फाडायचे आहे? ते काम मी येत्या 22 मार्चला गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत करेल असेही म्हटले. याचदरम्यान त्यांच्या उपस्थितीत मनसेच्या 17 वर्षातील प्रवासाबाबत आणि केलेल्या आंदोलन आणि इतर गोष्टींबाबत ‘आम्ही काय केलं’ या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच मनसेच्या संकेतस्थळाचेहीची यावेळी उद्घाटन करण्यात आले.

ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. याप्रसंगी मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार प्रमोद (राजू) पाटील आदी नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी ‘हत्ती’ विषयाचे अभ्यासक आनंद शिंदे आणि मनसे गौरवगीतातील कलाकरांचा यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना, पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात हाकलून लावण्याचे काम आपण केले तेव्हा हिंदुत्ववादी पक्ष कुठे होते, त्यांनी काय केले तर फक्त चिंतन केले, तसेच हिंदुत्व म्हणजे काय? असा प्रश्न विचारत हिंदुत्व जपमाळ नाही तर कृतीतून दिसायला हवे असा टोला ठाकरे यांनी लगावला. भोंग्याच्या विरोधात महाराष्ट्र नव निर्माण सेनेने केलेल्या आंदोलनामुळे राज्यभरात 17 हजारांहून अधिक मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्यावेळी मी म्हटले होते की, आपल्या वाटेला जायचे नाही, म्हणूनच मुख्यमंत्री पदावरून जावे लागले अशी टीका नाव न राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच प्रत्येक महापालिका जिंकायची आहे, त्यासाठी कामाला लागा, असा आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे यांनी संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी बोलताना लवकरच ज्यांनी हल्ला केला त्यांनाही समजेल, असा इशारा दिला. यावेळी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मनसेने केलेल्या कामाची माहिती दिली आणि नाशिककरांमध्ये आता हळहळ व्यक्त होत असल्याचे सांगितले. दादरच्या इंदू मिलच्या जागेवर जगातील सर्वात मोठे अभ्यास केंद्र साकारले जावे, ते खरे बाबासाहेबांचे स्मारक असेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रसारमाध्यमांनी गलिच्छ राजकारणाला प्रसिद्धी देणे थांबवायला हवे,असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -