घर ठाणे कल्याण पूर्व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण पूर्व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Subscribe

बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या वीस वर्षीय तरुणाने या मुलीच्या आईदेखत चाकूने वार करून हत्या केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. त्यामुळे कल्याण शहर सुन्न झाले आहे. गेल्या महिन्यात देखील याच परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. या विभागातून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असणार्‍या तसेच नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या मुली, महिला वर्गांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.
कल्याण पूर्व परिसर लोक वसाहतीने खचाखच भरून गेला आहे. नागरिकीकरण वाढत असल्याने अनधिकृत इमारती आणि चाळींमुळे बेकायदा वास्तव्य करण्यासाठी आलेल्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. मात्र झपाट्याने वाढत असलेले नागरीकरण तेवढ्याच गतीने गुन्हेगारीचे हॉटस्पॉट होताना दिसून येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ तीन मधील कोळसेवाडी पोलीस स्टेशन महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून गणले जात आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलींना पालकांना गुन्हेगारांची दहशत आहे.

परिसरात घडत असणार्‍या प्रकारामुळे पालक वर्गात मोठी चिंता आहे. आपल्या मुलींना शिकण्यासाठी शाळेत आणि महाविद्यालयात पाठवायचे की नाही? या मनस्थितीत कल्याण पूर्वतील पालक वर्ग आहे. पूर्व विभागातील शाळेत इयत्ता सातवीत शिकत असणारी एक बारा वर्षाची मुलगी आपल्या आई समवेत खासगी कोचिंग क्लासवरून रात्री आठ वाजता आपल्या घराकडील गृह संकुलात परतत होती. आरोपी आदित्य कांबळे गेल्या दोन-तीन दिवसापासून तिच्या येण्या जाण्यावर पाळत ठेवून होता. ही मुलगी आपल्या म्हणण्याला प्रतिसाद देत नाही म्हणून आदित्यने गृह संकुलापर्यंत तिचा पाठलाग करीत तिची हत्या केली. यावेळी या मुलीसोबत तिची आई होती. आईला ढकलून आदित्यने मुलीवर सात आठ चाकूने वार केले. शेजार्‍यांनी तातडीने या मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी बुधवारी तिला मृत घोषित केले. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आदित्यनेही फिनेल पिऊन स्वतःला संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र जमावाने त्याला पळू न देता कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला पुढील उपचारार्थ त्याला कळवा येथील रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

कल्याण पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. उभारल्या जाणार्‍या इमारती, गृहसंकुले आणि चाळींमध्ये अनेक लोक येऊन वास्त्यव्य करत आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीही वाढली आहे. पंधरा-वीस दिवसापूर्वी रस्त्यावरच एका गाव गुंडाने दहशतीच्या बळावर एका अल्पवयीन मुलीला आडोशाला घेऊन जात अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रसंगातून या मुलीने आपली सुटका केली. हा प्रकार कोळसेवाडी पोलिसांना समजल्यावर आरोपीला विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करीत त्याला अटक केली होती.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -