Homeठाणेखोदलेल्या रस्त्यांचे खापर ‘एमएमआरडीए’च्या माथी

खोदलेल्या रस्त्यांचे खापर ‘एमएमआरडीए’च्या माथी

Subscribe

मनपाचा कारभार

उल्हासनगर । शहरात भुयारी गटारीसाठी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने शहरातील प्रदुषणात प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाल्याची तक्रार करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी धर्मवीर आनंद दिघे चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत मनपा प्रशासनाने कंत्राटदारांवर कारवाई करण्याऐवजी ‘एमएमआरडीए’शी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यात येईल असे आश्वासन देऊन मनपा अधिकर्‍यांनी वेळ मारून नेल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या बाबत उपायुक्त डॉ. सुभाष जाधव यांनी एमएमआरडीए आणि मनपा अधिकार्‍यांची एक बैठक बोलवली आहे.

केंद्राची अमृत योजने अंतर्गत उल्हासनगरात 416 कोटीची भुयारी गटार योजनेतून संपूर्ण शहरात रस्ते खोदून भूमिगत गटारीचे वाहिन्या टाकण्यात येत आहे. मागच्या तीन महिन्यापासून शहरातील सात रस्ते खोदून मलवाहिन्या टाकण्याच्या काम संथ गतीने सुरू आहे. खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त केले नसल्याने, सर्वत्र धूळ पसरली आहे.शहरातील हवा प्रदूषणाची मात्रा दोनशेच्या पुढे गेल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मनपाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी मंगळवारी जनशक्तीचे स्वप्नील पाटील, प्रधान पाटील, सामाजिक संघटनेचे शैलेश तिवारी यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते कि वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यात येईल, त्या अनुषंगाने मनपा आयुक्त अजीज शेख यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून येत्या काही दिवसात रस्त्यांच्या निर्माण संबधी ठोस निर्णय घेऊन धुळीपासून नागरिकांची सुटका करावी, असे निर्देश मनपा अधिकार्‍यांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -