Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे ठाण्यात एकाच रात्रीत अनेक दुकानांचे शटर फोडले

ठाण्यात एकाच रात्रीत अनेक दुकानांचे शटर फोडले

Subscribe

 चार चोरट्यांना अटक

ठाण्यातील नौपाडा संकुलातील अनेक दुकानांचे शटर एकाच रात्री फोडून झालेल्या चोरीचे गूढ उकलण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चार चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  यामध्ये तीन मोटारसायकल, ५ मोबाईल फोन आणि रोख रकमेचा समावेश आहे. विशेष म्हणजे तपासात आतापर्यंत ९ प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.

१७ डिसेंबर २०२१ रोजी ठाण्यातील नौपाडा संकुलात अनिल ललवाणी यांचे मोबाईल रिपेअरिंग शॉप, अमित भास्कर यांचे सुमेश मेडिकल स्टोअर, प्रकाश पिरे यांचे पायरे इस्टेट कन्सल्टन्सी यासह एकूण सहा दुकानांचे शटर चोरट्यांनी फोडले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आणि सुगावाच्या आधारे एक-एक करून चौघांना पकडण्यात आले.

- Advertisement -

रवी उर्फ गणू धनगर (आंबिवली-कल्याण), राज राजपुरे (कुर्ला-मुंबई), राजकुमार सरोज (उल्हासनगर), बाळकृष्ण पाल (अंबरनाथ) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.  चौकशीत चोरट्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक, बदलापूर, कल्याण तालुका, भिवंडी, कोनगाव, पेण (रायगड) आणि चुनाभट्टी येथे प्रत्येकी एक चोरी व मोटारसायकल चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली आहे. नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर, रामचंद्र वलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, संगम पाटील यांच्या पथकाने या चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -