Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाणे टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाला स्थगिती !

ठाणे टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाला स्थगिती !

Subscribe

ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेत धर्मवीर आनंद दिघे आनंद नगर आगारात काम करणाऱ्या ४०० पेक्षा अधिक कंत्राटी महिला आणि पुरुष वाहकांच्या विविध मागण्यासाठी टी.एम.टी युनियनने सोमवारी २१ ऑगस्ट रोजी संपाचा निर्णय घेतला होता. दरम्यान परिवहन व्यवस्थापकांच्या चर्चा आणि आश्वासनाद्वारे नियोजित संपाला स्थगिती देण्यात आलेली आहे.  ठाणे परिवहनच्या धर्मवीर आनंद दिघे आनंदनगर आगारात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी महिला आणि पुरुष वाहकांच्या प्रलंबित विविध मागण्या संदर्भात सोमवारी २१ ऑगस्ट टी.ए.टी.मा.युनियनद्वारे संपाची हाक दिलेली होती.

दरम्यान कंत्राटी कर्मचारी यांच्या विविध मागण्याच्याबाबत आणि संपाच्या बाबत दिलेल्या निवेदनानंतर शनिवारी १९ ऑगस्ट रोजी ठाणे परिवहन व्यवस्थापक,परिवहन सभापती,टी.ए.टी.मा.युनियन अध्यक्ष, प[पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग कंत्राटी वाहक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात विविध मागण्या, समस्या आणि देणीबाबत सकारात्मक चर्चा पार पडली. कंत्राटी वाहकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले, लवकरच याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याने ठाणे टीएमटी कंत्राटी यांचा सोमवार २१ ऑगस्ट रोजीच्या नियोजित संपाला स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले. नियोजित संप स्थगित केल्याने परिवहनच्या सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी आप-आपल्या सध्या चालू असलेल्या  नियोजित कामगिरीवर  वेळेवर हजर राहावे असे आवाहन  टी.एम.टी युनियनद्वारे  करण्यात आलेले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -