घरठाणेकळवा खाडीवरील तिसरा पूल विटाव्यालाच उतरणार

कळवा खाडीवरील तिसरा पूल विटाव्यालाच उतरणार

Subscribe

 सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेसमोर

कळवा खाडीवरील तिसरा पूल  रेल्वे पुलावरुन पुढील बाजूस विटावा येथे उतरविण्यात यावा अशी मागणी मध्यंतरी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याला ठाणे महापालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखल आहे. त्यानुसार आता पालिका प्रशासन सल्लागार नेमणार असून तो प्रस्ताव येत्या म्हणजे गुरुवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. तसेच पालिकेने या पुलाचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
ठाणे ते कळव्याला जोडणाऱ्या ब्रिटीश कालीन पुलाच्या बाजूला महापालिकेने १९९५ साली दुसरा पुलाची निर्मिती केली.

त्यानंतर ब्रिटीश कालीन पुलाचे आयुर्मान संपुष्टात आल्याने तो पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यातच दुसऱ्या पुलावर देखील वाहतुक कोंडी होऊ लागल्याने त्याच खाडीवर तिसरा पुलाचे काम हे २०१४ मध्ये सुरु केले. १८३ कोटी ६६ लाख ६१ हजार ३५३ रु पयांचा खर्च करून उभारण्यात येणार पुल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उतरविण्यात येणार होता. मात्र पुढे रेल्वे पुलाखाली बॉटल नेक होऊन वाहतुक कोंडी होण्याची शक्यता होती.

- Advertisement -

त्यामुळे हा पुल रेल्वे पुलाच्या पलिकडे म्हणजेच पटनी पर्यंत नेण्याची मागणी  गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी केली होती. त्यानुसार मागील महासभेत या पुलाच्या वाढीव कामासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसाठी ठेवला आहे. तर या सल्लागाराकडून या वाढीव पुलाचा खर्च किती येईल रेल्वे पुलावरुन हा पुल पलिकडच्या बाजूला कसा उतरविता येईल याचा अभ्यास केला जाणार असून याचा खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -