घरठाणेफेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरून धावणार रेल्वे

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरून धावणार रेल्वे

Subscribe

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची माहिती

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिले जात असलेल्या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात पाचव्या सहाव्या रेल्वे मार्गिकेवरून लोकल सेवा सुरू होईल, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या आजच्या कामानंतर आणखी तीन वेळा रेल्वे मेगाब्लॉक घेईल, यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.त्यामुळे ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाचव्या – सहाव्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही डॉ शिंदे यांनी रविवारी सांगितले.

कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. गेल्या काही वर्षात या दोन मार्गिकांसाठी सातत्याने पाठपुरावा करत कल्याणचे खासदार डॉ. शिंदे यांनी कामाला गती दिली. काम मार्गी लावण्यासाठी तेसातत्याने प्रयत्नशील होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ही या कामाला गती दिली. रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी कार्य सुरू होते. त्यासाठी रविवारी मध्यरात्री पासून सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला.यादरम्यान कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी खासदार डॉ. शिंदे यांनी भेट दिली.

- Advertisement -

यावेळी त्यांनी कामाची पाहणी केली. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना पाचवी सहावीमार्गिका येत्या महिनाभरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वापरात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुढच्या आठवड्यात याच कामासाठी आणखी एकदा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच एकूण तीन मेगाब्लॉक ६ फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील, असेही डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.या कामामुळे लोकल रेल्वे त्यातही फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका असेल.त्यामुळे रेल्वे स्थानकात क्रॉसिंगचा प्रश्न राहणार नाही. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास मदत होईल,असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. या दोन मार्गामुळे शटल सेवा आणि लोकल फेऱ्या वाढण्याची आशा आहे .त्यामुळे यावर्षात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -