दहशत पसरणाऱ्या दोघांना केले एक वर्षासाठी स्थानबध्द 

शहर पोलिसांची कारवाई

clashesh between shinde group and bjp leader in kedgaon ahmednagar

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामधील वर्तकनगर व कासारवडवली या पोलीस स्टेशनचे हददीत दहशत पसरविणाऱ्या कुप्रसिध्द गुंड सागर उर्फ रूपेश सिताराम दळवी (२८) आणि कुप्रसिध्द गुंड योगेश परशुराम कारखांडीस (२५) या अट्टल गुन्हेगारांवर ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्धतेची प्रत्येकी एक वर्षाची कारवाई केली आहे. सागर याला पुणे येरवडा तर योगेश याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
सावरकर नगर येथील सागर याच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे इत्यादी एकुण ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २४ जानेवारी २०२३ रोजी कारवाई केली आहे. तर ओवळा येथील योगेश याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरी, गैर कायदयाची मंडळी जमविणे, दुखापत करणे, घराविषयी आगळीक करणे, धमकावणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे इत्यादी एकुण ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २३ जानेवारी २०२३ रोजी कारवाई केली आहे. तर ठाणे शहर पोलीस आयुक्तांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने त्यानुसार सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी यापुढे देखील ठाणे आयुक्तालय हददीत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई चालु राहणार आहे. असे म्हटले आहे.