घरठाणेवैभव गायकवाड यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निकालाची शक्यता

वैभव गायकवाड यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निकालाची शक्यता

Subscribe

महेश गायकवाड गोळीबार प्रकरण

कल्याण । दोन फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. याप्रकरणी आमदार पुत्र वैभव गायकवाड यांच्या अटक पूर्व अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. बुधवारी अर्जावर निकाल येऊ शकतो. वैभव गायकवाड यांच्या जामीन अर्जावर तीन तास सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू जोरदारपणे मांडत युक्तीवाद केला. मात्र वैभव गायकवाड यांच्यावर केलेले आरोप आणि सीसीटीव्ही फूटेज यामध्ये कशी तफावत आहे. हा मुद्दा गायकवाड यांच्या वकिलांनी उपस्थित केला.

महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्या सह पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना प्रथम पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. ते आता तळोजा कारागृहात आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेले आमदार गायकवाड यांचे पूत्र वैभव हे घटनेच्या दिवसापासून फरार आहेत. वैभव गायकवाड यांच्या अटक पूर्व जामिनाकरीता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. मंगळवारी दुपारी वैभव गायकवाड यांच्या वतीने वकिल सुदीप पासबोला, अनिकेत निकम आणि उमर काझी यांनी युक्तीवाद केला. तर महेश गायकवाड यांची बाजू वकील कासम शेख यांनी मांडली.
दोन्ही बाजूच्या वकीलांनी आपल्या बाजूने निकाल द्यावा याकरीता उच्च न्यायालयातील यापूर्वीच्या खटल्यातील निकालांचे दाखले दिले. अटक पूर्व अंतरिम जामीन अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून बुधवारी अर्जावर निकाल येऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -