घरठाणेकुकची हत्या केल्याने वेटरला जन्मठेपेची शिक्षा

कुकची हत्या केल्याने वेटरला जन्मठेपेची शिक्षा

Subscribe

डोक्यात गॅस सिलेंडर मारून केली होती हत्या

भिवंडीतील पूर्णागावात चार वर्षापूर्वी भिवंडीतील पूर्णागावात तंदुरी हॉटेलमध्ये काम करत असताना किरकोळ भांडणाचा राग मनात ठेवून डोक्यात गॅस सिलेंडर मारून कुकची हत्या करणाऱ्या एका वेटरला ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या घडलेल्या घटनेबद्दल नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी मंजीतकुमारवरचे आरोप सिद्ध झाल्याने न्या. तांबे यांनी आरोपीला जन्मठेपेचे शिक्षा ठोठावली आहे.मंजीतकुमार आणि अजित यांच्यात ५ जुलै २०१७ च्या ही घटना घडली होती.

भिवंडीतील पूर्णागावात तंदुरी कॉर्नर आणि चायनीच सेंटर हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आरोपी वेटर मंजीतकुमार याच्यासह कुक अजित रॉय तसेच अन्य एक कामगार असे तिघेजण काम करत होते. हे सर्व कागार रात्री मुक्कामाला हॉटेलमध्ये असत. मंजीतकुमार आणि अजित यांच्यात ५ जुलै २०१७ च्या रात्री कामावरून किरकोळ वाद झाला या वादातून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. हॉटेल मालकाने मध्यस्ती करुन ते भांडण मिटवले त्यानंतर रात्री दुकान बंद केल्यानंतर तिघेही कामगार दुकानात झोपले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी अजितला मार लागल्याची माहिती पानटपरी चालकाने दिल्यानंतर तो आणि त्याचा भाऊ तत्काळ दुकानावर आले.

- Advertisement -

दुकानामध्ये रक्ताच्या थारोळ्यात अजित पडला असल्याचे दिसले. त्यावेळी मंजीतकुमारने कपाळावर गॅस सिलेंडर मारल्याची माहिती दिली. अजितला उपचारासाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मंजीतकुमारविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाल्याने न्या. तांबे यांनी आरोपीला जन्मठेपेचे शिक्षा ठोठावली. अॅड. वर्षा चंदने यांनी सरकारी पक्षाचे काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक पी. एम भालेराव करत होते. पोलिस हवालदार एस. एस. जाधव, कॉन्स्टेबल जी. जी. पाचेगावकर, हवालदार एस. पी. जाधव, पोलिस नाईक एस. एस. म्हात्रे यांनी तपास केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -