रिजन्सी इस्टेटमधील पाण्याचे दुर्भिक्ष्य संपले

खासदार शिंदे यांचे प्रयत्न यशस्वी

shrikant shinde
shrikant shinde

गेले अनेक महीने रिजन्सी इस्टेट सोसायटीत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत होते. टँकरद्वारा पाणी मागवावे लागत होते. दुसरीकडे पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून अनेक दिवस एमआयडीसी कार्यालयात चकरा मारूनही काहीही सुधारणा होत नव्हती. येथील ज्येष्ठ नागरीकांच्या संघांच्या पदाधिकार्‍यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात धाव घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसात पाणीबाणी संपली. कल्याण ग्रामीणमध्ये रिजन्सी इस्टेट सोसायटी नावाचे मोठे गृह संकुल असून त्यामध्ये तब्बल 22 इमारती व बंगले आहेत. या भागात पाणी पुरवठ्याची समस्या अधून मधून निर्माण होत असते. मात्र एमआयडीसीने 15 दिवसांपूर्वी शट डाऊन घेतला. त्यानंतर या भागात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तातडीने या निवेदनाची दखल घेत कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख यांना सोमवारी सकाळी एमआयडीसीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यास सांगितले. त्यानुसार प्रफुल्ल देशमुख यांनी रिजन्सी इस्टेट मधील पाणी पुरवठ्या बाबत तांत्रिक माहिती, अडचणी समजून घेत एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. एमआयडीसीने देखील तितक्याच तातडीने यामधील तांत्रिक अडचणी दूर करीत पाणी पुरवठा पूर्ववत सुरु केला.