घरठाणेत्या महिलेला ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन

त्या महिलेला ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन

Subscribe

पाच महिन्याच्या बाळाच्या हत्येचा आरोप

अवघ्या पाच महिन्याच्या बाळाच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या एका आईची ठाणे सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. कळवा येथील एका झोपडपट्टीमध्ये १८ दिवसांपूर्वी हा गुन्हा घडला होता. तिच्या इतर दोन लहान मुलांचा विचार करता न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

याबाबत कळवा पोलिस दप्तरी दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार २४ डिसेंबर २०२१ रोजी ठाण्यातील कळवा भागात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले नगर या झोपडपट्टीत राहणाऱ्या शांताबाई चव्हाण (32) नावाच्या एका महिलेने तिच्याच पाच महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात बुडवून ठार केले होते. मात्र तिने तिचा गुन्हा लपविण्यासाठी बाळाला घरामधून कोणीतरी उचलून नेल्याचा कांगावा केला होता. या छोट्या तान्हुल्याला औषध पाजून झोळीत झोपविले होते. असे तिचे म्हणणे होते.

- Advertisement -

तिच्या म्हणण्यानुसार कळवा पोलिसांनी प्रथमदर्शनी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या छोट्या बाळाच्या हत्येनंतर कळवा पोलिस चक्रावून गेले होते. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता, तिच्याच घराजवळ एका पिंपामध्ये बाळाचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून बाळाचा तिच्या आईनेच खून केला असल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. कथित आरोपी शांतीबाईचे कुटुंब कर्नाटक राज्यातील असून ते मजुरी करण्याचे काम करते.

तिला मृत बाळा व्यतिरिक्त 5 वर्षीय आणि एक अडीच वर्षीय मुले आहेत. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर ही मुले आईच्या मायेला पारखी झाली असून या वयात त्यांना आईच्या प्रेमाची नितांत गरज आहे. त्यामुळे तिची जामिनावर मुक्तता करावी, असे तिचे वकील महेंद्र कोळसकर यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौतम शिरसाट यांच्यासमोर युक्तीवाद केला. वकील कोळसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश शिरसाट यांनी शांतीबाईची ७ जानेवारी २०२२ रोजी जामिनावर मुक्तता केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -