घरठाणे...तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अडथळे दूर होतील

…तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अडथळे दूर होतील

Subscribe

अंबरनाथ । राज्यात नऊ मेडिकल कॉलेज उभारण्यात येत असून त्या पैकी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील महत्वकांशी प्रकल्प असलेला शासकीय मेडिकल कॉलेज साठी 650 कोटींचा आर्थिक प्रस्ताव सरकारसमोर आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अंबरनाथ समवेत उल्हासनगर बदलापूर आणि ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल.

अंबरनाथ येथील शेतकी सोसायटीच्या, आरक्षण क्रमांक 180 येथील 24 एकर भूखंडावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून या वैद्यकीय महाविद्यालयात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया आणि पहिल्या टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार त्या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु या प्रकल्पाला शेतकी सोसायटीच्या लोकांनी विरोध केल्याने हे प्रकरण कोर्टात गेले आहे. या प्रकरणी 24 शेतकी सोसायटी सदस्यांनी पर्यायी जागा अथवा मोबदला देण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु शेतकी सदस्यांचा मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोसायटी सदस्यांनी केला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून शेतकरी तोडगा निघण्याच्या प्रतिक्षेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी पाठपुरावा करून ६५० कोटींचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या वैद्यकीय महाविद्यालयात विविध शैक्षणीक केंद्रे उभारण्यात येणार आहेत तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, नर्सिंग कॉलेजही उभारले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -