Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे मोहने परिसरात कोविड रुग्ण वा-यावर ;कोविड चाचणी सेंटर, क्वारंटाइन सेंटरही नाही

मोहने परिसरात कोविड रुग्ण वा-यावर ;कोविड चाचणी सेंटर, क्वारंटाइन सेंटरही नाही

कोट्यवधी रुपयांची कर पालिकेच्या तिजोरीत टाकूनही कोरोनाच्या काळात प्रशासनाचे ना लसीकरण, ना चाचणी सेंटर

Related Story

- Advertisement -

 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला मालमत्ता आणि पाणीपट्टी कर मोहनेतील आंबिवली, वडवली, अटाळी, गाळेगाव इत्यादी ठिकाणाहून कोट्यवधी रुपयांची भर कर रूपाने पालिकेच्या तिजोरीत टाकूनही कोरोनाच्या काळात प्रशासनाने ना लसीकरण, ना चाचणी सेंटर आणि रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटरही उभारलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने परिसरात वाढीस लागला असून उपचार आणि प्रतिबंधाबाबतही दिरंगाई होत आहे.  पालिका प्रशासनाने कल्याण, टिटवाळा, डोंबिवली, भिवंडी बायपास येथे रुग्णांवर उपचार करण्याकरता वैद्यकीय सेवा सुरू केली असली तरी रोजचे दोन हजारांच्या घरात कोरोना रुग्ण तपासणीत आढळून येत आहेत. प्रशासनाने विविध निर्बंध टाकूनही रुग्ण कमी होण्याऐवजी वाढत आहेत.

- Advertisement -

 

मोहने परिसरात एन आर सी शाळेत क्वारंटाइन सेंटर गेल्यावर्षी उभारले. मात्र त्याची सुरुवात होण्यापूर्वीच 318 बेड्स पालिका प्रशासनाने इतरत्र हलविल्याने  नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करू लागला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्पात नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी 97 कोटीची तरतूद केली असताना या तरतुदीचा मोहने विभागाला किंचितही फायदा होत असताना दिसून येत नाही. अडीच ते तीन लाख लोकसंख्या असणाऱ्या नागरिकांना आरोग्य व वैद्यकीय सेवा देण्यास प्रशासनाने सपशेल कोलांटी उडी मारली आहे. गेल्या आठवड्यात टिटवाळा येथे रुक्मिणी प्लाझा येथे 74 बेडचे रुग्णालय पालिका प्रशासनाने सुरू केले असून टिटवाळकरांची असणार हेळसांड यामुळे काहीशी कमी होणार आहे. मात्र मांडा-टिटवाळा व आजूबाजूच्या परिसरातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे कोरोना रुग्णांची दररोजची संख्या तीन आकडी होऊ लागली आहे. या ठिकाणी देखील

- Advertisement -