त्या 96 बालकांना मिळाली मदत

कोरोना काळात पालकांचे छत्र हरवले

कोरोनाच्या महामारीत आई आणि वडील अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या बालकांना मायेचा आधार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सरसावले आहे. अशाच ठाणे जिल्ह्यातील 96 बालकांना 15 लाखांची मदत मिळाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ठाणे जिल्ह्यात करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व स्विकारत केंद्र आणि राज्य सरकारने अशा बालकांना आर्थिक मदत जाहीर केली. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अर्थात पीएम केअर्स योजना केंद्राची आणि सीएम केअर्स योजना राज्याची राबवली जात आहे. या योजनेतून बालकांना लाभ मिळण्यासाठी अनेक महिने प्रतिक्षा करावी लागली होती.

पण अखेर ठाणे जिल्ह्यातील सुमारे 96 बालकांना सुमारे 5 आणि 10 लाखांची आर्थिक मदत त्यांच्या खात्यात देण्यात आली आहे. केंद्राकडून 10 लाख आणि राज्याकडून 5 लाख रूपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारची 10 लाखांची मदत 50 बालकांना तर राज्य सरकारची 5 लाखाची मदत 46 बालकांना मिळाली आहे. तर 1 हजार 412 जणांना बालसंगोपन योजनेत सामावून घेतले. गेली अनेक महिने रखडलेली ही रक्कम अखेर बालकांच्या खात्यात जमा झाली आहे.